रामजी की निकली सवारी...चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 09:53 PM2018-03-25T21:53:43+5:302018-03-25T21:53:43+5:30

रामजी की निकली सवारी... रामजी की लिला है न्यारी, हे राम, हे राम, तुहीे माता तुही पिता रे.. या श्रीरामाच्या भक्ती गीतांनी शहरातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. येथील श्रीराम जन्मोत्सव समिती तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंगदलतर्फे रविवारी (दि.२५) रामनगर व नेहरु चौकात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Ramji's ride ... the Gajar | रामजी की निकली सवारी...चा गजर

रामजी की निकली सवारी...चा गजर

Next
ठळक मुद्देश्रीराम जमोत्सवानिमित्त शहरात भव्य शोभायात्रा : युवकांची मोटारसायकल रॅली, ठिकठिकाणी महाप्रसादाचे वितरण

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : रामजी की निकली सवारी... रामजी की लिला है न्यारी, हे राम, हे राम, तुहीे माता तुही पिता रे.. या श्रीरामाच्या भक्ती गीतांनी शहरातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. येथील श्रीराम जन्मोत्सव समिती तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंगदलतर्फे रविवारी (दि.२५) रामनगर व नेहरु चौकात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दुपारी २ रामनगर येथील श्रीराम मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत शहरातील भाविक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. यामुळे संपूर्ण शहर प्रभू श्रीरामाच्या गजराने निनादून गेला होता. शोभायात्रेत सहभागी प्रत्येकाच्या मुखात प्रभू श्रीरामाचे नामस्मरण होते.
श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे रामनगर येथील श्रीराम मंदिरात विधीवत पूजा अर्चना करुन दुपारी २ वाजता शोभायात्रा काढण्यात आली. तर विश्व हिंदू परिषद, बजरंगदलतर्फे शहरात सकाळी भव्य मोटारसायकल रॅली व प्रभू श्रीरामाची रथ यात्रा काढण्यात आली. यात बजरंगदलचे कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. तर श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल यांनी श्रीराम मंदिरात पूजा अर्चना केली. आरतीनंतर शोभायात्रेला सुरूवात झाली. शोभायात्रेत प्रभू श्रीरामाच्या जीवनावरील विविध आकर्षक देखाव्यांचा समावेश होता. ढोल ताशांचा गजर आणि जय जय श्रीराम जयघोष आणि प्रभू श्रीरामाच्या भक्ती गीतांनी परिसर निनादून गेला होता. यानंतर ही शोभायात्रा रामनगर बाजार चौक, राजलक्ष्मी चौक, पाल चौक, गोल बंगला चौक, काले खा कंपनी, उड्डाणपूल, नेहरु चौक, इंगळे चौक, डॉ. चौरसीया मार्ग, नेहरु चौक, श्रीटॉकीज, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा तसेच शहरातील मुख्य मार्गावरुन गेली. शोभयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी प्रभू श्रीेरामाची पालखी व शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अग्रेसन भवन परिसरात शोभायात्रा पोहचल्यानंतर आरती करुन महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. विविध सामाजीक व धार्मिक आणि राजकीय संघटनातर्फे शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रेत सहभागी भाविकांना शीेतपेय, थंड पाणी, आईस्क्रीम, मसाले भात व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
विविध मान्यवरांनी घेतले दर्शन
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रामनगर येथील श्रीराम मंदिरात आ.गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते विविधत पूजा अर्चा करण्यात आली. मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीराम यांचे जीवन सर्वांनाच प्रेरणादायी असल्याचे आ.अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. या वेळी संस्था अध्यक्ष सुरेश अग्रवाल, सचिव कमल पुरोहीत, करसन वडेरा, भरत क्षत्रिय, राकेश ठाकूर, मोंटू पुरोहीत, क्रांती जायस्वाल, हरीश अग्रवाल, धनलाल ठाकरे, देवेंद्र अग्रवाल, कल्पेश चरखावाला, राकेश ठाकूर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. शहरातील विविध मान्यवरांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे स्थानिक नेहरु चौकात गुढीपाडव्याला भगवान श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दुपारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली. बजरंगदलाचे प्रांत संयोजक देवेश मिश्रा यांच्या नेतृत्त्वात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली

Web Title: Ramji's ride ... the Gajar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.