‘त्या’ रानडुकराला गावकऱ्यांनी केले ठार

By admin | Published: August 27, 2014 11:41 PM2014-08-27T23:41:09+5:302014-08-27T23:41:09+5:30

तीन वर्षांपासून बरबसपुरा आणि काचेवानीच्या हद्दीत असलेल्या नागरी वसाहतीत रात्रीच्या वेळी रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातून धान्य, खुरण आदींची नासाडी होत असल्याचे निदर्शनास आले होते.

'The' randukara killed the villagers | ‘त्या’ रानडुकराला गावकऱ्यांनी केले ठार

‘त्या’ रानडुकराला गावकऱ्यांनी केले ठार

Next

चार लोक जखमी : गावात शिरुन केलेल्या हल्ल्याने दहशत
काचेवानी : तीन वर्षांपासून बरबसपुरा आणि काचेवानीच्या हद्दीत असलेल्या नागरी वसाहतीत रात्रीच्या वेळी रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातून धान्य, खुरण आदींची नासाडी होत असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र भर दिवसा रानडुक्कर गावात शिरून लोकांना जखमी केल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. तान्हा पोळा असल्यानेच बरबसपुरा येथील रानडुकराच्या हल्ल्यातून अनेकजण बचावले तर चार जण जखमी झाले. संपूर्ण गावकऱ्यांनी अखेर एक तासाच्या प्रयत्नानंतर त्या रानडुकराला ठार करण्यात यश मिळविले.
काचेवानी परिसरातील बरबसपुरा गावाला लागून असलेले क्षेत्र तीन वर्षांपासून जंगली व हिंसक जनावरांमुळे असुरक्षित झालेले आहे. मध्यरात्री घरालगत येवून धान्याची नासाडी करणे, घराच्या वाडीत व अंगणात असलेल्या जमिनीतील कंद उपसून खाणे असे प्रकार सुरू होते. डुकरांच्या उपद्रवाने पिकांची नासाडी आणि नागरिक असुरक्षित असल्याच्या बातम्याही लोकमतने अनेक वेळा प्रकाशित केल्या. नासाडीचे प्रकरण वन विभाग तिरोडा यांना सादर करण्यात आले आहेत. डुकरांच्या भटकंतीतून होत असणाऱ्या नासाडीबद्दल वनविभागाने लक्ष केंद्रित करुन नुकसान थांबविण्याचे प्रयत्न करावे, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
तान्हा पोळा व मारबत असल्याने बरबसपुरा येथील चौकाचौकात लोकांची गर्दी होती. दुपारी ४ वाजता रानडुकराने गावाकडे धाव घेऊन एका महिलेच्या घरी प्रवेश केला आणि तिच्या मांडीच्या भागाला जोरदार चावा घेतला. जखमी महिलेचे नाव साखरन येळे (५५) सांगण्यात आले. गावातील नागरिकांचा हल्ला होताच घर आवारात उपस्थित असलेल्या महेंद्र भैरव परिहार (४०) याला खाली पाडले. त्याच्या छातीला मार लागून हातही फॅक्चर झाले. शालिकराम यादवराव कटरे (६०) हेसुद्धा जखमी झाले. त्यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड, हातोडे व कुऱ्हाडी घेऊन डुकराचा पाठलाग केला. पळता-पळता रानडुकराने ग्रामपंचायतच्या मागच्या बाजूला असलेल्या झुडूपाचा आश्रय घेतला. त्यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी दगडांसह काठ्या व लोखंडी साहित्याने वार करून एका तासाच्या प्रयत्नात त्या हिंसक डुकराला ठार केले.
जखमी झालेल्यांना एकोडी येथील रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. औषधोपचारानंतर घरी पाठविण्यात आले. याची माहिती वन परिक्षेत्राधिकारी चाटी यांना सांगण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपल्या पथकासह येऊन मृत डुकराचा पंचनामा केला.
गंगाझरी पोलीस घटनास्थळी आले. वन परिक्षेत्राधिकाऱ्यांनी मृत डुकराला उत्तरीय तपासणीसाठी तिरोडा येथे नेले. (वार्ताहर)

Web Title: 'The' randukara killed the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.