राणे यांनी जाहीर माफी मागून राजीनामा द्यावा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:31 AM2021-08-27T04:31:51+5:302021-08-27T04:31:51+5:30
गोरेगाव : केेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ...
गोरेगाव : केेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करीत शिवसेनेच्यावतीने गुरूवारी (दि.२६) तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले.
शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री राणे यांनी सोमवारी जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना आक्षेपार्ह विधान केले होते. यावर गुरुवारी (दि.२६) शिवसेनेच्यावतीने येथील दुर्गा चौकात तालुका प्रमुख मेघराज चौधरी व शहर प्रमुख दिलीप त्रिपात्रे यांच्या नेतृत्वात निदर्शने व हल्लाबोल करून निषेध नोंदवून राणे यांनी ठाकरे यांची माफी मागावी व पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. तसेच तहसीलदार सचिन गोस्वामी यांच्यामार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविले. शिष्टमंडळात शाखा प्रमुख गोरेलाल कुसरामम, अभय गौंधर्य, बंटी चौधरी, मुकेश शहारे, धर्मराज बंसोड, आवेराज भोंबरडे, शामराव मेश्राम, राजेंद्र राऊत, मनोज चचाने, देवेंद्र राऊत, नरेश श्रीपत्रे, राकेश आंबेडरे, रवी वाघमारे, नागेश्वर सोनवाणे, देवानंद येरणे, राजकुमार डोंगरे, बाळू तिघारे, शोभा लांजेवार,गीता बोलने, रोहित येरणे व शिवसैनिक उपस्थित होते.