रासेयोतर्फे साक्षरता रॅलीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 10:10 PM2017-09-10T22:10:30+5:302017-09-10T22:10:44+5:30
आंतरराष्टÑीय साक्षरता दिनानिमित्त जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयातील राष्टÑीय सेवा योजनातर्फे प्राचार्य डॉ.एन.वाय. लंजे व उपप्राचार्य डॉ.एस.एच.भैरम यांच्या मार्गदर्शनात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : आंतरराष्टÑीय साक्षरता दिनानिमित्त जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयातील राष्टÑीय सेवा योजनातर्फे प्राचार्य डॉ.एन.वाय. लंजे व उपप्राचार्य डॉ.एस.एच.भैरम यांच्या मार्गदर्शनात जगत महाविद्यालयापासून शहराच्या मुख्य रस्त्याने साक्षरता रॅली काढण्यात आली. या रॅलीत ‘साक्षर जनता भूषण भारता’ अशा अनेक घोषवाक्यातून जनजागृती करण्यात आली.
साक्षरता रॅलीत प्राचार्य डॉ.एन.वाय. लंजे, उपप्राचार्य डॉ.एस.एच. भैरम, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.जे.बी. बघेले, डॉ.सी.एस.राणे, डॉ.सी.पी. पटले, डॉ.एम.के. देशपांडे, प्रा. एल.वाय. ढवळे, डॉ.व्ही.टी. गजभिये, प्रा.आर.एम. गहाणे, डॉ.सी.टी. राहुले, डॉ.आर.बी. भैरम, प्रा.पी.बी. जवादे, डा.आर.एम. पिसे, डॉ.आर.एन. साखरे, प्रा.लोकेश कटरे तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी प्रा.जे.बी. बघेले, डॉ.सी.एस.राणे व रासेयो स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
एस.चंद्रा महिला महाविद्यालय
आमगाव : एस.चंद्रा महिला महाविद्यालयात जागतिक साक्षरता दिवस राष्टÑीय सेवा योजना व प्रौढ शिक्षणाच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य टी.एस. कळंबे, एनएसएस प्रमुख प्रा.एम.आर. शहारे, प्रौढ शिक्षण प्रमुख प्रा.के.के. मेश्राम, प्रा. दिप्ती चुटे, प्रा. भावना खापर्डे, प्रा.आर.के.मेश्राम, प्रा.आर.जी.कटरे, प्रा.आर.एन. चंद्रीकापुरे, प्रा.फुंडे, प्रा. दिक्षा रहांगडाले, प्रा.गोंडाणे, प्रा.एच.डी. कठाणे, शिक्षकेतर कर्मचारी टी.बी. ठाकुर, एस.एस.मेश्राम, एन.आर. लटये उपस्थित होते. सारक्षतेच्या बाबतीत राखी सोनवाने, निकीता लाडे, दिप्ती घरत यांनी माहिती दिली. संचालन वनिता रहांगडाले यांनी केले. आभार दिपीका कटरे यांनी मानले.
राणी लक्ष्मीबाई विद्यालय
कालीमाटी : कट्टीपार येथील राणी लक्ष्मीबाई विद्यालयात जागतिक साक्षरता दिन मुख्याध्यापक के.सी. ठाकरे यांच्या अध्यक्षतेत साजरा करण्यात आला. यावेळी अतिथी म्हणून आय.एम. गौतम, आर.एस. बावनथडे, एस.एल. बडोले, सी.जी. चौधरी, जी.बी. टेंभरे, बी.एम. सोमवंशी, एल.पी. शेेंडे उपस्थित होते. संचालन सी.जी. चौधरी तर आभार बी.एम. सोमवंशी यांनी मानले.
कार्यक्रमासाठी डी.आर.चौधरी, एम.एम. हत्तीमारे, डी.एस. भवरीया, लिंगू कोरे तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.