राष्ट्रसंतांनी मानवतेचा नंदादीप चेतविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 11:38 PM2019-01-05T23:38:57+5:302019-01-05T23:40:18+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य वास्तववादी, समाजोपयोगी आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून मानवतेचा नंदादीप घरोघरी चेतविला. ग्रामगीता घरोघरी वाचायला हवी, जेणेकरून प्रगतीशील भारताचे स्वप्न साकार होईल, असे उद्गार राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाच्या अध्यक्ष उषाकिरण आत्राम यांनी काढले.

Rashtriya Rashtra Sansarata laitya of humanity | राष्ट्रसंतांनी मानवतेचा नंदादीप चेतविला

राष्ट्रसंतांनी मानवतेचा नंदादीप चेतविला

Next
ठळक मुद्देउषाकिरण आत्राम : राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन, दोन दिवस विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य वास्तववादी, समाजोपयोगी आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून मानवतेचा नंदादीप घरोघरी चेतविला. ग्रामगीता घरोघरी वाचायला हवी, जेणेकरून प्रगतीशील भारताचे स्वप्न साकार होईल, असे उद्गार राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाच्या अध्यक्ष उषाकिरण आत्राम यांनी काढले.
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद व नवजीवन शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सडक-अर्जुनी तालुक्यातील राका येथे दोन दिवसीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती राज्यस्तरीय संमेलनाला शनिवारपासून (दि.५) सुरुवात झाली. संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. संमेलनाचे उदघाटन महाराष्टÑ राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य लखनसिंह कटरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य पंचायतराज तज्ज्ञ समिती सदस्य चंदू पाटील मारकवार, गडचिरोली श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, संमेलनाचे प्रेरक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, स्वागताध्यक्ष यशवंत दुनेदार, पुण्याचे गोवंश अभ्यासक पंढरीनाथ चंदनखेडे, ग्रंथमित्र भाऊराव पत्रे, अड्याळ टेकडीचे डॉ. नवला मुळे, मधुसूदन दोनोडे, सरपंच रेखा चांदेवार, प्राचार्य पुडके उपस्थित होते. स्वागतपर भाषण यशवंत दुनेदार यांनी केले. बोढेकर यांनी साहित्य संमेलनाची भूमिका मांडून राष्ट्रसंत साहित्य आजच्या जागतिकीकरणाच्या काळात समस्त मानवजातीला दिशादर्शक असल्याचे सांगितले. लखनसिंह कटरे म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भारताला आर्थिक नितीचा मसूदा दिला.सरकारने ग्रामगीतेचे धोरण स्विकारल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. चंदू पाटील म्हणाले, घाणीच्या विळख्यातून गावाला निर्मळ करायचे असेल तर हातात झाडू आणि डोक्यात राष्ट्रसंताचे विचार गेले पाहिजेत. राष्ट्रसंताच्या साहित्यातून माणूस जोडला गेला पाहिजेत. डॉ. कुंभारे म्हणाले, राष्ट्रसंतानी सामुदायिक ध्यान व प्रार्थना ह्या उपासना सांगितल्या आहेत. त्याचा अवलंब प्रत्येकाने करावा. संमेलनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनात पुर्वाध्यक्ष लक्ष्मणदादा नारखेडे व आदिवासी साहित्यिक सुन्हेर ताराम यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. संचालन डॉ.राजेंद्र जेनेकर यांनी केले तर आभार महेंद्र दोनोडे यांनी मानले.

ग्रामस्तरावर कार्य करणाऱ्यांचा सत्कार
या वेळी राज्यस्तरीय सेवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. चैतन्य युवा पुरस्कार पवन पाथोडे, ताराचंद कापगते, मोहनदास मेश्राम, मंगला आखरे, सुधाकर कुर्वे, शुभम तुंडूलवार यांना प्रदान करण्यात आले. विशेष पुरस्कारांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती पुरस्कार डॉ. शिवनाथ कुंभारे यांना, संत गाडगेबाबा प्रबोधन पुरस्कार सप्तखंजेरीवादक उदयपाल वणीकर यांना, सेवा पुरस्कार संजीव पोडे यांना, श्रीगुरूदेव कृषी सेवा पुरस्कार चोपराम कापगते सिंदीपार यांना, भारतरत्न डॉ. आंबेडकर विचार प्रचार पुरस्कार प्रमिला अलोणे यांना, संत मंजुळा माता महिला सेविका पुरस्कार मुक्ता हत्तीमारे यांना, श्रीगुरूदेव भजन गायन पुरस्कार सुकराम बनकर सितेपार यांना, साने गुरुजी लोकशिक्षक पुरस्कार सुरज सयाम, नामदेव लोंढे स्मृती उत्कृष्ट नाट्य कलावंत चंदू पाथोडे सौंदड यांना,श्रीगुरूदेव श्रम श्री पुरस्कार अनिल डोंगरे यांना,सावित्रीबाई फुले आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार कोमल बोरकर यांना प्रदान करण्यात आला. विचारपीठावर सतिश लोंढे, विलास उगे, नामदेव गेडकर, दलितमित्र नाना वाढई उपस्थित होते.

साहित्य दिंडीने सुरुवात
राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाची सुरूवात गावातून राष्ट्रसंत साहित्य दिंडीने करण्यात आली. ग्रामगीता, संविधान, तुकाराम गाथा आदी ग्रंथ दिंडीत ठेवण्यात आले होते. साहित्य दिंडीत शालेय विद्यार्थी, भजन मंडळी, बँड पथक, गावकरी सहभागी झाले होते. गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
 

Web Title: Rashtriya Rashtra Sansarata laitya of humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.