शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:04 PM2019-07-15T22:04:35+5:302019-07-15T22:04:52+5:30
शासनातर्फे गोरगरिब लाभार्थ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकाला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. संबंधित विभागाने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना लाभ शेवटच्या घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनातर्फे गोरगरिब लाभार्थ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकाला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. संबंधित विभागाने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना लाभ शेवटच्या घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गोंदियामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.दयानिधी, जिल्हा पुरवठा अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते. परिणय फुके म्हणाले, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गोंदियातर्फे जिल्ह्यातील १ लाख २० हजार कुटुंबांना गॅस जोडणीचे वाटप आणि ६ लाख १८ हजार ६५० नागरिकांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे.
या योजनेतंर्गत शिधापत्रिकाधारकांना १० किलो गहू २ रु पये दराने आणि २५ किलो तांदूळ ३ रुपये दराने वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ही योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.यावेळी पालकमंत्री परिणय फुके यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शन व शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.