३८ लाख पुस्तकांचे केले वाचन
By admin | Published: October 19, 2016 02:56 AM2016-10-19T02:56:53+5:302016-10-19T02:56:53+5:30
जिल्ह्यात दप्तरविरहीत दिन वाचन आनंद दिन म्हणून जिल्ह्यातील १६८४ शाळांमध्ये साजरा करण्यात आला.
वाचन आनंद व प्रेरणा दिन : २ लाख ३८ हजार ७ विद्यार्थ्यांची उपस्थिती
गोंदिया : जिल्ह्यात दप्तरविरहीत दिन वाचन आनंद दिन म्हणून जिल्ह्यातील १६८४ शाळांमध्ये साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील २ लाख ३८ हजार ७ विद्यार्थ्यांनी शनिवारी ३७ लाख ९२ हजार ४३६ पुस्तकांचे वाचन केले. जिल्ह्यात साक्षरता दिनी राबविलेल्या ‘वाचन आनंद’ दिवसाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. त्याचाच परिपाक म्हणून शनिवारी रावबविण्यात आलेल्या वाचन आनंद कार्यक्रमात ३८ लाख पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचली.
जिल्ह्यातील आठही तालुक्यात वाचन आनंद दिवसाला भरभरून प्रतिसाद मिळाला. अवांतर वाचनाची प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी १० पुस्तके हाताळली. वर्ग १ ते १२ वी पर्यंतच्या जिल्ह्यातील १६८४ शाळांतील २ लाख ३८ हजार ७ विद्यार्थ्यांनी ३७ लाख ९२ हजारापेक्षा अधिक पुस्तकाचे वाचन केले.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३२ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी ५ लाख ३ हजार ९ पुस्तकाचे वाचन केले, आमगाव तालुक्यातील २३ हजार १९४ विद्यार्थ्यांनी ३ लाख ७९ हजार ५३० पुस्तकाचे वाचन केले, देवरी तालुक्यातील २० हजार २२ विद्यार्थ्यांनी२ लाख ८३ हजार ९५१ पुस्तकाचे वाचन केले, गोंदिया तालुक्यातील ७० हजार ७०५ विद्यार्थ्यांनी १ हजार ५६ हजार ९८६ पुस्तकाचे वाचन केले, गोरेगाव तालुक्यातील २३ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी ३ लाख ८५ हजार ३०९ पुस्तकाचे वाचन केले, सालेकसा तालुक्यातील १५ हजार २१४ विद्यार्थ्यांनी २ लाख ४८ हजार ९५८ पुस्तकाचे वाचन केले, सडक-अर्जुनी तालुक्यातील२० हजार ७१६ विद्यार्थ्यांनी ३ लाख १६ हजार ३९४ पुस्तकाचे वाचन केले, तिरोडा तालुक्यातील ३१ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी ५ लाख १८ हजार २९८ पुस्तकाचे वाचन केले.(तालुका प्रतिनिधी)