विद्यार्थ्यांनी फोडली समाजातील समस्यांना वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 09:53 PM2017-11-13T21:53:47+5:302017-11-13T21:55:17+5:30

आपल्या बाजुला दररोज विविध घटना घडतात. बºयाच समस्या आपल्या लक्षात येवून त्या आपल्याला मांडता येत नाही.

Read the problems of students blown up by the students | विद्यार्थ्यांनी फोडली समाजातील समस्यांना वाचा

विद्यार्थ्यांनी फोडली समाजातील समस्यांना वाचा

Next
ठळक मुद्देलेखणीतून मांडली मते : लोकमतचा उपक्रमबालकदिन विशेष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपल्या बाजुला दररोज विविध घटना घडतात. बºयाच समस्या आपल्या लक्षात येवून त्या आपल्याला मांडता येत नाही. यासर्व घडामोंडीविषयी विद्यार्थ्यांना सुध्दा अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांवर व्यक्त होण्याची व त्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्याचा त्यांचा मानस असतो. मात्र त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळत नाही. लोकमतने बालक दिनाचे औचित्त्य साधून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची व स्वत:च्या लेखणीनतून मते मांडण्याची संधी उपलब्ध करुन दिली. यावेळी शारदा कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि.१३) लोकमत जिल्हा कार्यालयाला भेट देऊन तिथे चालणाºया कामकाजाची माहिती घेतली. तसेच स्वत: बातमीदाराची भूमिका पार पाडून काही बातम्या संपादित केल्या. बालकदिनाच्या पूर्व संध्येला लोकमतने उपलब्ध करुन दिलेल्या या संधीबद्दल विद्यार्थ्यांनी लोकमतचे आभार मानले. यावेळी शारदा कॉन्व्हेंटचे चित्रेश भेलावे, वलय बिसेन, जय लांजेवार, नेहा चव्हाण, श्वेता कोंटागले, भूमिका लारोकर, आशुतोष अवस्थी, वेदी बिसेन व शिक्षक पी.ए.फुंडे व व्ही.ए.खोब्रागडे उपस्थित होते.

वृक्षारोपण करुन करा पर्यावरणाचे संवर्धन-वेदी बिसेन
वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे जंगलाचे प्रमाण कमी होत आहे. शहरातील हिरवळ देखील नष्ट होत चालली आहे. त्याचे गंभीर परिणाम पर्यावरण होत आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्वांनी वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. झाडांमुळे आपल्या प्राणवायु मिळतो. शिवाय कार्बन डायआॅक्साइड व कार्बन मोनआॅक्साइडचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. पर्यावरणाच्या ºहासामुळे दिल्लीत प्रदूषणाची समस्या बिकट झाली आहे. तेथील लोकांना मास्क लावून फिरण्याची वेळ आली आहे. ही वेळ गोंदियातील नागरिकांवर येऊ नये, यासाठी सर्वांनी आत्तापासूनच काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकांनी किमान एक झाड लावण्याचा संकल्प करावा. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज आहे.
अंधश्रद्धेला नका घालू खतपाणी -नेहा चव्हाण
आपली आधुनिकतेकडे वाटचाल सुरू असली तरी अजूनही समाजात मोठ्या प्रमाणात अनिष्ठ रुढी पंरपरा कायम आहेत. यामुळे अनेकदा समाजात तेढ निर्माण होतो. त्यामुळे वैज्ञानिक युगात अंधश्रध्देला खतपाणी न घालता लोकांमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प बालकदिनी विद्यार्थ्यांनी करावा. अंधश्रध्देला खत पाणी न मिळाल्यास समाजात एकोपा वाढविण्यास मदत होईल. रस्त्यावर भटकंती करणारे व बालमजुरी करणाºया मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा विकास साधवा. या बालकदिनी विद्यार्थ्यांनी समाजातून अनिष्ठ रूढी पंरपरा नष्ट करुन एका समृध्द समाजाची निर्मिती करावी.
विद्यार्थ्यांना मिळावे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन- भूमिका लारोकर
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. युवकांना पुढे जाण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. मात्र नेमका याच गोष्टीचा सध्या अभाव आहे. त्यामुळे आजच्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी शहर आणि ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेविषयक मार्गदर्शन केंद्र उघडण्यात यावे. विद्याथी व युवकांना चालू घडामोंडीची माहिती देऊन त्यांनी कुठल्या क्षेत्राची व अभ्यासक्रमाची निवड करावी, तसेच कुठल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. यादृष्टीने मार्गदर्शन मिळाल्यास आदर्श समाजाची निर्मिती करण्यास मदत होईल.
वाढत्या अपघातांना लावा प्रतिबंध- आशुतोष अवस्थी
अलीकडे अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यापैकी बरेच अपघात हे वाहतुकीच्या नियमांची माहिती नसल्याने घडलेले आहेत. वाढत्या अपघातांच्या घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी वेळीच उपाय योजना राबविण्याची गरज आहे. बालकदिनी विद्यार्थ्यांनी लोकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा संकल्प करावा. तसेच अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये असे आवाहन पालकांना करावे.

Web Title: Read the problems of students blown up by the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.