दिल्लीपासून गल्लीपर्यंत लढण्यास तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 10:32 PM2018-04-17T22:32:23+5:302018-04-17T22:32:23+5:30
बाबासाहेब दलित, शोषीत व पिडीत समाजाचा बुलंद आवाज होते. दलित, शोषीत व पिडीतांच्या उत्थान, संरक्षण व संवर्धनासाठी बाबासाहेबांनी तयार केलेले कायदे केंद्र सरकार बदलून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न करित आहे.
गोंदिया : बाबासाहेब दलित, शोषीत व पिडीत समाजाचा बुलंद आवाज होते. दलित, शोषीत व पिडीतांच्या उत्थान, संरक्षण व संवर्धनासाठी बाबासाहेबांनी तयार केलेले कायदे केंद्र सरकार बदलून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न करित आहे. मात्र देशातील दलित, शोषीत व पिडीत समाजाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने नेहमी पुढाकार घेतला आहे.कायद्यातील कोणत्याही बदलाचा कॉंग्रेस पक्ष पुरजोर पणे विरोध करीत असून गरज पडल्यास संसदेपासून गल्लीपर्यंत लढण्यासाठी तयार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजीत अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले, बाबासाहेब दलीत, शोषीत व पिडीत समाजाचे रक्षक होते, तसेच संविधान रचेता व समाज सुधारक होते. ते पहिले कायदेमंत्र होते की ज्यांनी स्वतंत्र्यता, समान काम-समान वेतन, महिलांना मतदानाचा अधिकार सारख्या बदलांसाठी प्रयत्न केले. यामुळेच ते सर्वव्यापी महामानव आहे. बाबासाहेबांनी समाज सुधारण्याचे कार्य केल्यामुळेच आज भारतात जातीभेद, प्रांतभेद, गरिबी-अमिरी सारखे भेद बाजूला सारून बाबासाहेबांच्या सपनातील भारत बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला खासदार प्रफुल्ल पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. प्रा. कृष्णा मेश्राम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिलीप बंसोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, अरूण गजभिये, डॉ. प्रा.महेंद्र लोधी, डॉ. अश्विन सोनटक्के, प्रा.बबन मेश्राम, प्रा.शशीकांत चौरे, डॉ. राहूल बागडे, मिलींद रामटेके, राजकुमार जैन, विनोद हरिणखेडे, शकील मंसूरी, गजानन उमरे, विष्णू दोनोडे, पी.एस.फुले, प्रमोद गजभिये, रमेश ठवरे, चंद्रप्रकाश नागदिवे, डॉ. विनोद बडोले, राजेंद्रप्रसाद बंसोड, अविनाश नेवारे, विजय शेंडे, प्रदीप गजभिये, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.