२६ सेवानिवृत्त व आदर्श ग्रामसेवकांचा सत्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:32 AM2021-09-23T04:32:31+5:302021-09-23T04:32:31+5:30
गोंदिया : मयूर लॉन कटंगी येथे ग्रामसेवक युनियनचे वार्षिक अधिवेशन व ग्रामसेवक पतसंस्था आमसभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य ...
गोंदिया : मयूर लॉन कटंगी येथे ग्रामसेवक युनियनचे वार्षिक अधिवेशन व ग्रामसेवक पतसंस्था आमसभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, गोंदियाचे गट विकास अधिकारी दिलीप खोटेले, मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण, जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन उपस्थित होते.
मुकाअ यांच्या हस्ते सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त झालेले जे. टी. पारधी, एम. ए. रहिले, बनकर, ब्राह्मणकर, संग्रामे, शरणागत, मस्करे, नागलवाडे, एच. बी. माहुले, अरविंद नागदेवे, डी. के. बड़ोले, के. ए. लिल्हारे, बी. एम. चांदेवार,बी. एम. हटवार, पी. एम. गौतम, आर. एम. पटले, एस. एम. भेलावे, एस. जे. पटले, एफ. के. सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. सन २०१५-१६ ते २०१९-२० मध्ये आदर्श ग्रामसेवक म्हणून निवड झालेल्या सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांनी ग्रामसेवक संवर्गाच्या कोरोना कालावधीत केलेल्या कार्याची दखल घेत कौतुक केले. मुकाअ पाटील यांनी ग्रामसेवक संवर्गाला शासनाच्या विविध योजना अंमलबजावणी करताना घ्यायची काळजी व उपाययोजना यावर मार्गदर्शन केले.