टंचाईच्या २८६ कामांना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 09:16 PM2019-06-28T21:16:16+5:302019-06-28T21:16:36+5:30
जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील १४७ गावे आणि वाड्यांतील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी टंचाईच्या २८६ उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामधून विंधन विहिरींची विशेष दुरुस्तीची कामे घेण्यात येतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील १४७ गावे आणि वाड्यांतील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी टंचाईच्या २८६ उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामधून विंधन विहिरींची विशेष दुरुस्तीची कामे घेण्यात येतील.
यामध्ये, ग्राम कारु टोला, माकडी, दासगाव (बु), किन्ही, भानुटोला, नवाटोला, मुरपार, रजेगाव, झालुटोला, खातीटोला, मजीतपूर, सोनपुरी, पोलाटोला, निलागोंदी, गंगाझरी, जुनेवानी, टिकायतपूर, पारडीबांध, खर्रा, ओझीटोला, पांगडी, आसोली, मुंडीपार (खु), फुलचूरटोला, लोधीटोला (धा), धापेवाडा, झिलमिली, चिरामणटोला, सिंधीटोला, भगवानटोला, कामठाटोली, कटंगीकला, सोनिबहरी, सुंदरटोली, घिवारी, लोधीटोला, गोंडीटोला, छिपीया, काटी, मरारटोला, बाजारटोला, कन्हारटोला, चुलोद, मोरवाही, इर्री, दासगाव (खु), सितुटोला, फुलचूर, लोधीटोला (चु), चुटीया, रायपूर, चंगेरा, शेरकाटोला, कोचेवाही, मरारटोला, सतोना, धामणगाव, नवरगाव कला, पोवारीटोला, दागोटोला, बघोली, कलारीटोला, उमरी, दांडेगाव, हेटीटोला, पैकाटोला, गुदमा, आवारीटोला, जानाटोला, रापेवाडा, चिचटोला, फत्तेपूर, बरबसपुरा, दतोरा, नवरगाव (खु), वडेगाव, बनाथर, जानाटोला, कासा, जिरु टोला, कोरणी, डोंगरगाव, किडंगीपार, लंबाटोला, भानपूर, सेजगाव, मुंडीपार (ढा), नंगपुरा (मु), रतनारा, पठाणटोला, फोनटोली, पाटीलटोला, कलारटोला, हरिसंगटोला, पांजरा, खमारी, हलबीटोला (ख), कारंजा, ढाकणी, डांगोरली, शिवनी, तेढवा, बिरसी (का), परसवाडा, परसवाडाटोला, चिरामणटोला, एकोडी, रामपुरी, निलज, बलमाटोला, शिरपूर, सावरी, लोधीटोला (सा), हलबीटोला (सा), नागरा, चांदनीटोला, कटंगटोला, कुडवा, पिंडकेपार, लोहारा, गोंडीटोला, रामपहाडी, बिर्सी/दा., मरारटोला, हाबुटोला, रावणवाडी, गोंडीटोला, कटंगटोला, कटंगटोला (घि), बुधूटोला, चिरामणटोला, जब्बारटोला, पुजारीटोला, खातीया, मोगर्रा, भादुटोला, धामनेवाडा, दवनीवाडा, कामठा, वळद, चारगाव, अर्जुनी, गर्रा (बु) अशा एकूण १४७ निश्चीत केलेल्या जागांवर विंधन विहिरींची दुरूस्ती करण्यात येणार आहे. यासाठी १२ लाख २५ हजार ५१० रुपयांचा खर्च केला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.