रेकार्ड ब्रेक २२९ कोरोना बाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 05:00 AM2020-09-12T05:00:00+5:302020-09-12T05:00:11+5:30

जिल्ह्यात शुक्रवारी आढळलेल्या २२९ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक १६९ कोरोना बाधित हे गोंदिया शहरातील आहे. तर उर्वरित रुग्ण जिल्ह्यातील इतर भागातील आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोना बाधितांच्या आकड्यात दिवसागणिक वाढ होत आहे. त्यातच मृतकांच्या संख्येत सुध्दा वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोना ऑऊट ऑफ कंट्रोल झाल्याचे चित्र आहे.

Record break 229 corona infestations recorded | रेकार्ड ब्रेक २२९ कोरोना बाधितांची नोंद

रेकार्ड ब्रेक २२९ कोरोना बाधितांची नोंद

Next
ठळक मुद्देचार बाधितांचा मृत्यू : ११ दिवसात १४१० वर रुग्णाची नोंद, गोंदिया शहरात सर्वाधिक १६९ कोरोना रुग्ण, संसर्गात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील आठ दहा दिवसांपासून सर्वत्र कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना बाधितांचे आकडे दररोज नवीन रेकार्ड करीत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि.११) रेकार्ड ब्रेक २२९ कोरोना बाधितांची नोंद झाली तर चार बाधितांचा मृत्यू झाला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा असून सर्वाधिक रुग्ण हे गोंदिया शहरातील आहे.त्यामुळे शहर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले असून जिल्ह्यावासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी आढळलेल्या २२९ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक १६९ कोरोना बाधित हे गोंदिया शहरातील आहे. तर उर्वरित रुग्ण जिल्ह्यातील इतर भागातील आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोना बाधितांच्या आकड्यात दिवसागणिक वाढ होत आहे. त्यातच मृतकांच्या संख्येत सुध्दा वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोना ऑऊट ऑफ कंट्रोल झाल्याचे चित्र आहे. १ ते ११ सप्टेंबर दरम्यान २४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्याच्या कालावधीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. तर मागील अकरा दिवसात २४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. १४१० वर रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असताना दुसरीकडे मात्र आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार पुढे येत आहे.त्यामुळे अनेक जण कोरोनाची लक्षणे दिसत असताना तपासणी करण्यासाठी जात नसल्याने संसर्ग वाढण्यास मदत होत आहे.कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना त्यावर उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना आऊट कंट्रोल झाला आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्यामागे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष देखील आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालय आणि शहरातील बाजारपेठेतील काही व्यावसायीकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे.ऐवढेच नव्हे तर मेडिकलमध्ये सुध्दा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करुन त्यांची कोरोना टेस्ट करण्याची गरज आहे. तसे केल्यास कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यास मदत होवू शकते. मात्र याकडेच दुर्देवाने दुर्लक्ष होत आहे.

पालकमंत्र्यांनी सोडले जिल्ह्याला वाऱ्यावर
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यातच आरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार दररोज पुढे आहे.जिल्ह्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. ही पदे अजूनही भरण्यात आली नसल्याने कोरोना काळात रुग्णांवर उपचार करण्यास यंत्रणा अपुरी पडत असून कार्यरत आरोग्य कर्मचारी तणावाखाली वावरत आहे. अशा स्थितीत पालकमंत्र्यांनी या सर्व गोष्टींचा आढावा घेवून युध्द पातळीवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. मात्र तसे काहीच होताना दिसत नसून पालकमंत्र्यांनी जिल्हा वाºयावर सोडल्याचे चित्र आहे.

Web Title: Record break 229 corona infestations recorded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.