१५ दिवसांत १४.३२ लाखांची वसुली

By admin | Published: May 19, 2017 01:30 AM2017-05-19T01:30:01+5:302017-05-19T01:30:01+5:30

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाद्वारे नागपूर-गोंदिया-राजनांदगाव-दुर्ग लोहमार्गावरून धावणाऱ्या प्रवासी गाड्या व रेल्वे स्थानकांवर

Recovery of 14.32 lakhs in 15 days | १५ दिवसांत १४.३२ लाखांची वसुली

१५ दिवसांत १४.३२ लाखांची वसुली

Next

 विशेष तिकीट तपासणी अभियान : २७४ प्रवासी गाड्या व रेल्वे स्थानकातील कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाद्वारे नागपूर-गोंदिया-राजनांदगाव-दुर्ग लोहमार्गावरून धावणाऱ्या प्रवासी गाड्या व रेल्वे स्थानकांवर १ ते १५ मे २०१७ पर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या १५ दिवसांत दंडस्वरूपात १४ लाख ३८ हजार ९३५ रूपयांची वसुली करण्यात आली.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मंडळातील नागपूर-गोंदिया-राजनांदगाव-दुर्ग लोहमार्गावरून धावणाऱ्या एकूण २७४ प्रवाशी गाड्या व रेल्वे स्थानकांत विविध विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विनातिकीट/अनियमित प्रवास तथा माल बुक न करता लगेजच ४ हजार ७५८ प्रकरणे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून दंडस्वरूपात एकूण १४ लाख ३८ हजार ९३५ रूपयांची वसुली करण्यात आली. याशिवाय केरकचरा पसरविणाऱ्यांबाबत ५३ प्रकरणे दाखल करण्यात आली. यात त्यांच्याकडून दंडस्वरूपयात ४ हजार ८०० रूपये वसूल करण्यात आले.
सदर विशेष तिकीट तपासणी अभियानांतर्गत गोंदियात किले बंदी चेकिंगदरम्यान सहायक वाणिज्य व्यवस्थापक ओ.पी. जायस्वाल यांच्या पुढाकारात २ मे २०१७ रोजी विनातिकीट/अनियमित प्रवास तथा माल बुक न करताच लगेजचे ६०९ प्रकरणे केवळ एकाच दिवसात नोंद करण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख ९३ हजार ७०० रूपये दंडस्वरूपात वसूल करण्यात आले.
 

Web Title: Recovery of 14.32 lakhs in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.