१८ दिवसात १७.३१ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 09:13 PM2018-02-24T21:13:12+5:302018-02-24T21:13:12+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या वतीने मंडळातंर्गत धावणाऱ्या एकूण ३६७ प्रवासी गाड्या व प्रमुख रेल्वे स्थानकांत १ ते १८ फेब्रुवारीपर्यंत विविध विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या वतीने मंडळातंर्गत धावणाऱ्या एकूण ३६७ प्रवासी गाड्या व प्रमुख रेल्वे स्थानकांत १ ते १८ फेब्रुवारीपर्यंत विविध विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात केवळ १८ दिवसांत १७ लाख ३१ हजार ३२० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दपूम रेल्वेच्या नागपूर मंडळाद्वारे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकारात तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाºयांच्या सहकार्याने मंडळातील विविध लोहमार्गावरून ये-जा करणाºया एकूण ३६७ प्रवासी गाड्या व प्रमुख स्थानकांत १८ दिवसांपर्यंत विविध विशेष तपासणी अभियान राबविण्यात आले.
यात विना तिकीट प्रवास तथा माल बुक न करताच लगेज नेण्याचे सात हजार ७२४ प्रकरणांची नोंद करण्यात आली. त्यांच्याकडून दंड स्वरूपात १७ लाख ३१ हजार ३२० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय केरकचरा पसरविणारे १८० प्रकणात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंड स्वरूपात १७ हजार ३८० रूपयांची वसुली करण्यात आली. सहायक मंडळ वाणिज्य व्यवस्थापक ओ.पी. जायस्वाल यांच्या मार्गदर्शनात तिकीट निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ३ फेब्रुवारीला भंडारा रोड स्थानकावर किलेबंदी चेक व येथून ये-जा करणाऱ्या २८ प्रवासी गाड्यांमध्ये विनातिकीट, अनियमित प्रवास तसेच माल बुक करताच लगेज वाहून नेणारे १०६९ प्रकरणे केवळ एकाच दिवसांत नोंदविण्यात आले. त्यांच्याकडून एकूण दोन लाख १३ हजार ९९५ रूपये वसूल करण्यात आले.