चोरी ३० लाखांची रिकव्हरी ३ लाखांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:58 PM2018-01-01T23:58:50+5:302018-01-01T23:59:26+5:30

रेल्वे गाड्यांमध्ये मागील वर्षभरात चोरीच्या १४० घटना घडल्या. यात एकूण ३० लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

The recovery of 30 lakhs of theft of Rs. 3 lakh | चोरी ३० लाखांची रिकव्हरी ३ लाखांची

चोरी ३० लाखांची रिकव्हरी ३ लाखांची

Next
ठळक मुद्देरेल्वेगाड्यांत वाढले चोरीचे प्रकार : ७२ टक्के घटना गुलदस्त्यात

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : रेल्वे गाड्यांमध्ये मागील वर्षभरात चोरीच्या १४० घटना घडल्या. यात एकूण ३० लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. मात्र यापैकी केवळ ३६ घटनांचा छडा लावून तीन लाख ६५ हजार रुपयांची रिकव्हरी करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. तर बरीच प्रकरणे अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे चित्र आहे.
रेल्वे प्रवास करायचा आहे तर स्वत:च्या सामानांचे स्वत:च संरक्षण करण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. रेल्वे परिसर किंवा रेल्वेगाडीमधून सामानांची चोरी झाली तर पोलीस शोध घेतील, याची अपेक्षासुद्धा करू नये. हे रेल्वे परिसर व गाड्यांमध्ये झालेल्या चोºया व प्रकरणांचा तपास करण्यात आलेल्या पोलिसांना आलेल्या अपयशामुळे म्हणण्याची वेळ आलीे आहे. मागील वर्षभरात गोंदिया रेल्वे पोलिसांना चोरीच्या घटना उघडकीस आणण्यात ७४ टक्के पिछाडीवर. त्यातच चोरीच्या प्रकरणांतील रिकव्हरीतही ८८ टक्के माघारल्याचे चित्र आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान गोंदिया रेल्वे पोलीस ठाणे क्षेत्रात रेल्वे प्रवाशांसह चोरीच्या १४० घटना घडल्या. यात ३० लाख ९६ हजार ३५१ रूपयांच्या सामानांची चोरी झाली.
रेल्वे पोलिसांनी केवळ ३६ घटनांचा तपास पूर्ण करून उघडकीस आणल्या. यात तीन लाख ६५ हजार ८२६ रूपयांच्या सामानांची रिकव्हरी पोलिसांनी केली आहे. तर तब्बल १०४ घटना उघडकीस आणण्यात व २७ लाख ३० हजार ५२५ रूपयांच्या सामानांची रिकव्हरी करण्यात अपयशी ठरले आहेत. चोरीच्या घटना उघडकीस आणण्याचा दर २६ टक्के व सामानांच्या रिकव्हरीचा दर केवळ १२ टक्के आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
चोरीच्या मोबाईलचे मालकही बेपत्ता
रेल्वे प्रवाशांच्या सामानांच्या चोरीच्या घटनांमध्ये सर्वाधिक घटना मोबाईल चोरीच्या घडल्या आहेत. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार सन २०१७ मध्ये मोबाईल चोरीच्या ५० ते ६० घटना नोंद झाल्या आहेत. पोलिसांनी जवळपास दीड महिन्यापूर्वी तीन मोबाईल चोरांना अटक करून त्यांच्याकडून २४ मोबाईल जप्त केले होते. मागील दीड महिन्यात त्यापैकी केवळ एका मोबाईलच्या मालकाचा पत्ता लागू शकला. उर्वरित मोबाईलच्या मालकांचा शोध अद्याप लागू शकला नाही.
२६ मृतदेहांची ओळख पटली नाही
मागील वर्षभरात रेल्वे ट्रॅकवर विविध घटनांमध्ये ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २५ मृतदेहांची ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबातील लोकांनी आपल्या सामाजिक मान्यतेनुसार अंतिम संस्कार केले. तर १४ मृतदेह अनोळखी असल्यामुळे अंतिम संस्कारादरम्यान त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती नव्हती. गोंदिया रेल्वे पोलीस ठाणे क्षेत्रात नैसर्गिक मृत्यूच्या ३२ घटना घडल्या.

Web Title: The recovery of 30 lakhs of theft of Rs. 3 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.