२३ दिवसांत ३९ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:21 AM2018-07-04T00:21:32+5:302018-07-04T00:22:25+5:30

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत धावणाऱ्या प्रवासी गाड्या व रेल्वे स्थानकांमध्ये १ ते २३ जून दरम्यान विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या २३ दिवसांत विनातिकीट, अनियमित प्रवास व माल बुक न केलेल्या लगेजची १३ हजार ९९३ प्रकरणे नोंद करून त्यांच्याकडून ३८ लाख ९८ हजार २९४ रूपयांची वसुली करण्यात आली आहे.

Recovery of 39 lakhs in 23 days | २३ दिवसांत ३९ लाखांची वसुली

२३ दिवसांत ३९ लाखांची वसुली

Next
ठळक मुद्देरेल्वेचे विशेष तिकीट तपासणी अभियान : कचरा पसरविणाऱ्यांना ४१ हजारांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत धावणाऱ्या प्रवासी गाड्या व रेल्वे स्थानकांमध्ये १ ते २३ जून दरम्यान विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या २३ दिवसांत विनातिकीट, अनियमित प्रवास व माल बुक न केलेल्या लगेजची १३ हजार ९९३ प्रकरणे नोंद करून त्यांच्याकडून ३८ लाख ९८ हजार २९४ रूपयांची वसुली करण्यात आली आहे.
मंडळ रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मंडळातील विविध खंडांवरून ये-जा करणाऱ्या एकूण ५०७ प्रवासी गाड्या व रेल्वे स्थानकांमध्ये विविध विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. त्या अंतर्गत विनातिकीट प्रवास, अयिनमित प्रवास व माल बुक न केलेल्या लगेजचे १३ हजार ९९३ प्रकरणे नोंद करण्यात आले. त्यांच्याकडून ३८ लाख ९८ हजार २९४ रूपयांची वसुली करण्यात आली.
तसेच रेल्वे परिसरात कचरा फेकणे पसरविण्याचे प्रकार ४२२ जणांना भोवले असून त्यांच्याकडून दंड स्वरूपात ४१ हजार २५० रूपयांची वसुली करण्यात आली. केरकचरा स्थानकात असलेल्या कचराकुंड्यांमध्ये न घालता त्यांनी स्थानक परिसरात इतरत्र कचरा पसरविला होता.
मंडळाद्वारे अनियमित व विनातिकीट प्रवासावर अंकुश लावण्याच्या उद्देशाने स्थानक व प्रवासी गाड्यांमध्ये विशेष तिकीट अभियान राबविले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यासाठी योग्य तिकीट घेवूनच प्रवास करावा, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
बोगीची जबाबदारी ट्रेन कॅप्टनवर
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे मंडळातील सर्व लांब अंतराच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये तिकीट तपासणी स्टाफच्या वरिष्ठ सदस्यांना ट्रेन कॅप्टन नामित केले जात आहे. त्यांच्यावर डब्याची स्वच्छता, विद्युत पुरवठा, सीटवर ताबा व प्रवासी सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राहणार आहे. तसेच गाडी सुटण्यापूर्वी एनाऊंसमेंट सिस्टमद्वारेसुद्धा ट्रेनमध्ये तैनात ट्रेन कॅप्टनची माहिती प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व प्रवाशांपर्यंत सुविधा पोहोचावी, ही जबाबदरी ट्रेन कॅप्टनची राहणार आहे.
विनापावतीचा दंड
नागपूर-गोंदिया व गोंदिया-नागपूर अशा प्रवासात तिकीट चेकींगदरम्यान मासिक पास धारकांना विनापावतीचा दंड केला जात आहे. तिकीट तपासणी करणारे रेल्वेचे कर्मचारी या प्रवाशांकडून १०० ते ४०० रूपयांपर्यंतचा दंड घेवून त्यांना कसल्याही प्रकारची पावती न देता त्यांना त्यांच्या गंतव्य स्थानकापर्यंत प्रवास करू देतात. या रकमेचा हिशेब रेल्वे प्रशासनाकडे नसते. मात्र पैसा न दिल्यास कारवाई करण्याची धमकीसुद्धा रेल्वे कर्मचारी देतात. अशी ओरडसुद्धा प्रवासी व नियमित मासिक पासधारक करीत आहेत.

Web Title: Recovery of 39 lakhs in 23 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे