पेट्रोल डिझेल घरगुती गॅसच्या किमती कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:14 AM2021-01-13T05:14:54+5:302021-01-13T05:14:54+5:30
नवेगावबांध : डिझेल-पेट्रोल व घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमती कमी करा, या मागणीला घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी ...
नवेगावबांध : डिझेल-पेट्रोल व घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमती कमी करा, या मागणीला घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.११) अर्जुनी-मोरगाव येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे सरकार आले, तेव्हापासून डिझेल-पेट्रोल व घरगुती वापराच्या गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सामान्य जनतेला दैनंदिन जीवन जगताना वाढलेल्या किमतीमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे डिझेल-पेट्रोल व घरगुती गॅसच्या किमती त्वरित कमी करण्यात याव्या, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. भाववाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक शाखेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांच्यामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर तरोणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष निप्पल बरैया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, उद्धव मेहंदळे, योगराज हलमारे, योगेश नाकाडे, त्रिरत्न शहारे, रितेश चौरे, सुदेश राखडे यांचा समावेश होता.