गर्भवतींना ‘रेफर टू नागपूर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:00 AM2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:00:32+5:30
ती दहशत कमी करण्याची जवाबदारी ज्या डॉक्टरांवर आहे तेच डॉक्टर कोरोनाच्या नावावर गोंदियाच्या गर्भवतींना रेफर टू नागपूर करीत आहे. त्यामुळे गोरगरिबांनी काय करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थितीत केला आहे. लोकांच्या आरोग्यासंबधी अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सर्वत्र कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असला तरी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेल्या लोकांना तातडीची सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरगरीब गर्भवतींना प्रसूतीसाठी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात आणल्यावर त्यांना रेफर टू नागपूर केले जाते असल्याची ओरड वाढली आहे.
गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्यात तेवढी जनजागृती नाही. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिक दहशतीत आहेत.
ती दहशत कमी करण्याची जवाबदारी ज्या डॉक्टरांवर आहे तेच डॉक्टर कोरोनाच्या नावावर गोंदियाच्या गर्भवतींना रेफर टू नागपूर करीत आहे. त्यामुळे गोरगरिबांनी काय करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थितीत केला आहे. लोकांच्या आरोग्यासंबधी अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
कोरोनाला घेऊन सगळीकडेच विदारक स्थिती असतानाही अत्यंत आवश्यक असलेल्या रूग्णांचा उपचार करणे आवश्यक आहे.परंतु गंगाबाई स्त्री रूग्णालयात असे होताना दिसत नाही.
कोरोनाच्या नावावर गर्भवतींना रेफर करणाऱ्या डॉक्टरांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सूचना देण्याची गरज आहे.
खासगी डॉक्टरांचे दवाखाने बंदच
नेहमीच गोंदिया जिल्हावासीयांकडून उपचाराच्या नावावर श्रीमंत होणारे बहुतेक डॉक्टरांनी संकटाच्या काळात आपल्या दवाखाने बंद करून ठेवले आहेत. खासगी दवाखाने सुरू ठेवण्याची गरज असताना खासगी डॉक्टरांनी आपले दवाखने बंद केले आहेत. काही डॉक्टरांनी खूप विनंती केल्यावर आधी रूग्णांची सखोल चौकशी केल्यानंतरच उपचार करणार किंवा नाही असा डॉक्टरांचा पवित्रा आहे. या संकटाच्या काळात माणुसकीच्या नात्याने खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडे करण्याची गरज आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय महाविद्यालय तसेच महिला आणि बालकांसाठी स्वतंत्र बाई गंगाबाई महिला रुग्णालय स्थापन करण्यात आले. मात्र सध्या कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव असताना बीजीडब्ल्यू रुग्णालयातील डॉक्टर गर्भवती महिलांना रेफर टू नागपूर करीत आहे. हा प्रकार मागील आठवडाभरापासून सुरू असून याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देऊन डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना देण्याची गरज आहे.
- दिलीप बन्सोड, माजी आमदार.