विविध ठिकाणी राजेंना मानाचा मुजरा

By Admin | Published: February 22, 2017 12:29 AM2017-02-22T00:29:18+5:302017-02-22T00:29:18+5:30

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हाभरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली

Regardless of the royal status in various places | विविध ठिकाणी राजेंना मानाचा मुजरा

विविध ठिकाणी राजेंना मानाचा मुजरा

googlenewsNext

गोंदिया : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हाभरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. काही ठिकाणी मार्गदर्शन, रॅली व मिरवणुकीचे आयोजन केले होते.
मानवता शाळा
गोंदिया : मानवता शाळेत सोमवारी (दि.२०) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवजन्मोत्सव म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक सी.एस.कटरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून एम.एच.शेंडे, एम.झेड.शेंडे, एस.वाय.चौरागडे, ए.पी.खोब्रागडे, एस.पी.कोडापे, एस.एस.रिनाईत, एल.एम.शेंडे, झेड.एच.रहांगडाले, डी.एच.घरत, एस.पी. शिवरकर, एस.बी.टेंभरे, एन.बी.गोंडाणे, झेड.सी.टेंभरे, बी.एस. भोयर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी पाहुण्यांनी शिवाजी महाराजांच्या विजारांप्रमाणे प्रत्येक नागरिकांचे मूलभूत विचार असावे. यासाठी प्रगत शिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही शिवाजींच्या जीवनावर आधारीत भाषण व गीत सादर केली. संचालन झेड.एच.रहांगडाले यांनी केले. आभार एस.वाय.चौरागडे यांनी मानले.
शारदा कॉन्व्हेंट
गोंदिया : शारदा कॉन्व्हेंटमध्ये शिव जयंती थाटात साजरी करण्यात आली असून मुख्याध्यापीका उमा रहांगडाले यांच्या हस्ते छत्रपतींच्या छायाचित्राला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी छत्रपतींच्या जीवनावर आधारीत भाषणे, गीत, पोवाडे, लघुनाट्य सादर केले. कार्यक्रमाला शाळेतील तारा खोटेले, विनोद खोब्रागडे, राजेश बिसेन, संतोषसिंह नैकाने, पंकज फुंडे, अनिल माखिजा, सागर फरकुंडे, श्रद्धा धांडे, हेमलता दीप, शहारूनिशा पठाण, शबाना शेख, चंद्रकला बसेने, बरखा दाते व अन्य शिक्षक उपस्थित होते.
प्रतापगड, अर्जुनी-मोरगाव
बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव व गोठनगाव वन विभागाच्या संयुक्तवतीने प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी छत्रपाल रहांगडाले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वन कर्मचारी दखने, धुर्वे, दहिवले यांच्यासह प्रतापगड वन समितीचे पदाधिकारी, हरितसेनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. याप्रसंगी किल्ला व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
जानकीदेवी चौरागडे हायस्कूल
गोंदिया : जानकीदेवी चौरागडे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व इंदिराबेन पटेल प्राथमिक शाळेत शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद चौरागडे, मुख्याध्यापिका रेखा चौरागडे, लाडे, रामटेके व सर्व शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी भाषण व गीत सादर केले. शिक्षकांनी शिवराजी महाराजांचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगीतले. प्रास्तावीक सचिव हिवरे यांनी मांडले. संचालन नेहा लांजेवार व पौर्णिमा सुरसाल यांनी केले. आभार साक्षी घासले यांनी मानले.
तालुका कुणबी महासंघ
सालेकसा : तालुका कुणबी महासंघ व गावकऱ्यांच्या संयुक्तवतीने शिवाजी महाराज जयंती सप्ताह साजरा करण्यात आला. यांतर्गत आठवडाभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात निबंध स्पर्धा, कवि संमेलन, दौड स्पर्धा, स्वच्छता मोहिम, वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. तर शिव जयंतीच्या दिवशी रॅली काढण्यात आली. भगवा फेटा बांधून रॅलीत पुरूष व महिला सहभागी झाल्या. बसस्थानक येथे शिव जयंती साजरी करण्यात आली.
उद्घाटन राज्याचे माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरत बहेकार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाज सेविका सविता बेदरकर, शिव व्याख्याते श्रीकांत बरिंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हा परिषद सदस्य लता दोनोडे, कर्मचारी संघटनेचे लिलाधर पाथोडे, पंचायत समिती सभापती हेमलता डोये, सदस्य जया डोये, जयप्रकाश शिवणकर, प्रमोद शिवणकर, भाजप तालुकाध्यक्ष परसराम फुंडे, क ॉग्रेसचे अनिल फुंडे, माजी सभापती तुकाराम बोहरे, कल्पना बहेकार, वासुदेव फुंडे, पोलीस पाटील राजेंग्र बागळे, इसराम बहेकार, अजय डोये, शशिकला फुंडे, वासुदेव चुटे, मोनालिसा ब्राम्हणकर उपस्थित होते.
शिवाजी महाराज, जिजाऊ व त्यांच्या आध्यात्मिक गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी महादेवराव शिवणकर यांनी, शिवरायांच्या धाडसावरील अनेक उदाहरण सादर करीत मार्गदर्शन केले. तर उपस्थित पाहुण्यांनीही शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवरायांचे अनुयायी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कुणबी महासंघ, महिला कुणबी महासंघ व गावकऱ्यांनी सहकार्य केले.
विदर्भ पाटबंधारे कर्मचारी पतसंस्था
गोंदिया : विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन पतसंस्थेचे पालक संचालक सुरेशगीर क.रिधनार्थी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पतसंस्थेचे अंतर्गत लेखा परीक्षक खु.वि.नागफासे, के.डी.मुनेश्वर,एस.के.भोयर, मंगरु हिरापुरे, बाबूलाल माहुले व इतर उपस्थित होते.
ग्राम

Web Title: Regardless of the royal status in various places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.