सातबारावर महिलांच्या नावाची नोंदणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:36 PM2017-09-09T23:36:02+5:302017-09-09T23:36:24+5:30
शेतीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटूंबातील महिला काबाडकष्ट करतात. शेतीत राबताना अपघात होवून एखाद्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात वारसांना कोणताही लाभ मिळत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : शेतीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटूंबातील महिला काबाडकष्ट करतात. शेतीत राबताना अपघात होवून एखाद्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात वारसांना कोणताही लाभ मिळत नाही. शेतीची सहमालक व विविध योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने शेतकºयांनो आपल्या कुटूंबातील मुलीचे, सुनेचे आणि पत्नीचे नाव सातबाºयावर नोंदवा, असे आवाहन तिरोड्याचे तहसीलदार संजय रामटेके यांनी केले आहे.
तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथे सार्वजनिक गणेश मंडळ चिरेखनी समाज ग्रामसंस्था व कल्याण ग्रामसंस्था, जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित संवाद पर्व कार्यक्रमात ते बोलत होते. गटविकास अधिकारी इनामदार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, सरपंच जगन्नाथ पारधी, उपसरपंच सोनू पारधी, विस्तार अधिकारी उके, बन्सोड, कृषीमित्र नंदराम पारधी, पाणलोट समतिीचे सचिव लेखराम राणे, माविमच्या तालुका कार्यक्रम समन्वयक शिल्पा येडे, ग्रामसेवक तिडके उपस्थित होते. एक गाव एक गणपती ही संकल्पना चिरेखनी या गावात प्रत्यक्ष साकारली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक कार्यक्र म आयोजित करण्यात येतात.
संवाद पर्व हा कार्यक्रम शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केला जात आहे. शेतकºयांनी आता सेंद्रीय शेती करून पिकांचे उत्पादन घ्यावे, सेंद्रीय शेत मालाला चांगला भाव मिळतो, सेंद्रीय शेतीमुळे विषमुक्त अन्न उपलब्ध होण्यास मदत होते. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, श्रावणबाळ या विविध योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गावातील प्रत्येक कुटूंबातील महिला ही बचतगटात सदस्य आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी पैशाच्या बचतीला सुरुवात तर केली आहेच यापुढेही जावून त्या उद्योग व्यवसायाची कास धरीत असल्याचे सोसे यांनी सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने संवाद पर्वाच्या आयोजनातून ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे होणार असल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी ग्रामसंस्थेच्या अध्यक्ष चंद्रकला बिसेन, उपाध्यक्ष रेघन पारधी, सचिव चंद्रकला कुर्वे, सहसचिव जीवनकला पारधी, कोषाध्यक्ष कल्पना रिनाईत, कल्याण ग्रामसंस्थेच्या अध्यक्ष पोर्णिमा शहारे, उपाध्यक्ष स्वानंदा कोटांगले, सचिव निला पारधी, सहसचिव अलका कुर्वे, कोषाध्यक्ष मुनेश्वरी भगत, जोती पटले, वैशाली पारधी, प्रणिता राणे, गीता मडावी यांनी सहकार्य केले.
तर शासकीय योजनांचा लाभ नाही
स्वच्छ भारत मिशन कार्यक्र माची अंमलबजावणी तालुक्यात करण्यात यावी. गावातील कोणतेही कुटूंब उघड्यावर शौचास जाणार नाही याची दक्षता घ्यावी. जे उघड्यावर शौचास जातील त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे इनामदार यांनी सांगितले.