नियमित लसीकरण मासिक आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:20 AM2021-06-20T04:20:27+5:302021-06-20T04:20:27+5:30
जिल्हास्तरीय मासिक आढावा बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. चांदेवार, निवासी वैद्यकीय अधिकारी ...
जिल्हास्तरीय मासिक आढावा बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. चांदेवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, साथरोग अधिकारी डॉ. सुशांकी कापसे, डॉ. निरंजन अग्रवाल, चौधरी, आशा समन्वयक राजेश दोनोडे, साथरोग सर्वेक्षक मंजू रहांगडाले, घरोटे, शालिनी कोरेटी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, बाल रुग्णालय व सर्व ग्रामीण रुग्णालयाचा नियमित लसीकरण कार्यक्रमाचा आढावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी घेतला. कोविड प्रतिबंध कार्यक्रमाच्या नादात नियमित लसीकरण कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण लसीकरण हेच बाळाचे कवच कुंडल आहेत. बालक एक वर्षाचे होईपर्यंत त्याचे संपूर्ण लसीकरण ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे झालेच पाहिजे, याकडे सर्व डॉक्टरांनी लक्ष दिले पाहिजे. असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहबे यांनी सांगितले. युनिसेफचे विभागीय अधिकारी डॉ. साजिद यांनी जपानी मेंदूज्वर प्रतिबंधक लसीबाबत सविस्तर माहिती दिली. लसीकरण करणाऱ्या स्टाफचे प्रशिक्षण आयोजित करण्याचे आवाहन केले. गोवर रुबेला उच्चाटन मोहिमेत खासगी डॉक्टरांचे सहकार्य घेण्याचे आवाहन डॉ. साजिद यांनी केले. लवकरच निमा व आयएमएसोबत सेमिनार आयोजित करण्याचे निर्देश दिले.