त्या रूग्णाच्या नातेवाईकांचा पत्ताच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 05:00 AM2021-08-01T05:00:00+5:302021-08-01T05:00:27+5:30
देवरी ग्रामीण रूग्णालयात १२ जुलै ही व्यक्ती (वय अंदाजे ५५) भर्ती झाली होती व त्यांच्या पायाला जखम झाली असून त्याला किडे लागल्याने त्यांना १३ जुलै रोजी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने येथील केटीएस रूग्णालयात पाठविण्यात आले. तेव्हापासून ते रूग्णालयात भर्ती असून त्यांच्या पायाच्या जखमेला किडे लागले होते. विशेष म्हणजे, हा रूग्ण स्वत:चे नाव किंवा अन्य काहीच माहिती देत नसून उपचारही करू देत नसल्याने त्यांना अवस्थपणा आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रस्त्यावर अवस्थेत असलेल्या एका इसमाला १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेव्दारे येथील केटीएस रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. १३ जुलैपासून ते भर्ती असूनही अद्याप त्यांची विचारपूस करण्यासाठी कुणीही आलेले नाही. यामुळे त्यांच्या उपचारावर परिणाम पडत असून डॉक्टरांचीही अडचण होत आहे.
माणूस हा सामाजिक प्राणी असून त्याला मोठ्या परिवारासह समाजात लोकांमध्ये वावरावेसे वाटते. यासाठीच त्याला मोठा परिवार लागत असून प्रसंगी परिवारच आपल्यासाठी धावून येणार अशी त्याचा समज असता. मात्र बदल्यात काळानुसार आता माणसाची प्रवृत्तीही बदलत चालली असून रक्ताचे नातेच आज रक्तासाठी धावून येत नसल्याच्या कित्येक घटना रोजच्या जीवनात घडत आहेत. असाच एक प्रकार उघडकीस आला असून येथील केटीएस रूग्णालयात भर्ती असलेल्या एका व्यक्तीची साधी विचारपूस करण्यासाठी कुणीही आला नसल्याची माहिती आहे.
देवरी ग्रामीण रूग्णालयात १२ जुलै ही व्यक्ती (वय अंदाजे ५५) भर्ती झाली होती व त्यांच्या पायाला जखम झाली असून त्याला किडे लागल्याने त्यांना १३ जुलै रोजी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने येथील केटीएस रूग्णालयात पाठविण्यात आले. तेव्हापासून ते रूग्णालयात भर्ती असून त्यांच्या पायाच्या जखमेला किडे लागले होते. विशेष म्हणजे, हा रूग्ण स्वत:चे नाव किंवा अन्य काहीच माहिती देत नसून उपचारही करू देत नसल्याने त्यांना अवस्थपणा आली आहे.
शिवाय, त्यांच्या पायाची जखम वाढून शस्त्रक्रियेची गरजही येऊ शकते. मात्र यासाठी डॉक्टरांनाही त्यांच्या नातेवाईकांची गरज आहे. मात्र एवढे दिवस लोटूनही त्यांना बघण्यासाठीही कुणीही आलेले नाही.
डॉक्टरांनी स्विकारली त्यांची जवाबदारी
- रूग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर रोली गुप्ता, जय पवार यांना मागील ४ दिवसांपासून हा रूग्ण दिसून आल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. यानंतर त्यांनी रूग्णाला आपल्या जवळील जेवण देणे सुरू केले असून विचारपूस केली. मात्र ते काहीच सांगायला तयार नाही. यावर त्यांनी रूग्णालयात जेवणाची सोय करणारे लायंस क्लबचे प्रतीक कदम यांच्याशी संपर्क साधला तेथूनच हे प्रकरण पुढे आले. हा रूग्ण रूग्णालयातील सर्जरी वॉर्ड क्रमांक-१ मध्ये भर्ती असून कुणालाही काही माहिती मिळाल्यास संपर्क साधावा असे कदम यांनी कळविले आहे.