अटी शिथील करून वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 09:11 PM2018-11-10T21:11:14+5:302018-11-10T21:11:47+5:30
महाराष्ट्र शासनाद्वारे शिक्षकांकरिता वरिष्ठ श्रेणी (१२ वर्ष) व निवड श्रेणी (२४ वर्ष) सुधारित योजनेनुसार देत असल्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. करिता अटी शिथील करुन शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र शासनाद्वारे शिक्षकांकरिता वरिष्ठ श्रेणी (१२ वर्ष) व निवड श्रेणी (२४ वर्ष) सुधारित योजनेनुसार देत असल्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. करिता अटी शिथील करुन शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केली आहे. याकरिता परिषदेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व ज्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा या प्रगत शाळा व शाळा सिद्धी प्रमाणे ‘ए’ ग्रेड आहेत. ज्या माध्यमिक शिक्षकांच्या इयत्ता ९ वी व इयत्ता दहावीचा निकाल ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांनाच वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ अनुज्ञेय राहील. त्यानुसार ग्रेड ‘ए’ मध्ये नसणाऱ्या वर्ग ९ वी व १० वीचा निकाल ८० टक्के नसणाºया शिक्षकांवर अन्याय होईल व त्यांचे आर्थिक नुकसान होईल असे निवेदनात नमूद आहे.
शिक्षकांना १२ व २४ वर्षांपेक्षा जास्त सेवांतर्गत कालावधी होऊनही वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाची व्यवस्था, मागील दोन वर्षापासून करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत आहे. करिता अटीमध्ये शिथीलता आणण्यात यावी व शिक्षकांचे तसेच वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे व शिक्षकांचे होणारे आर्थिक नुकसान व मानसिक त्रास दूर करावा. सदर वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी नियुक्ती दिनांकापासून अनुक्रमे १२ व २४ वर्षानंतर प्रशिक्षणासंबंधीचे हमीपत्र घेवून लागू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी धार्मिक यांच्यामार्पत मुख्यमंत्री फडणवीस यांन पाठविण्यात आले. यावेळी शिक्षक परिषदेचे राधेशाम पंचबुद्धे, जिल्हा कार्यवाह गुणेश्वर फुंडे, जिल्हा कोषाध्यक्ष छत्रपाल बिसेन, राजेंद्रसिंह तोमर, आनंद बिसेन, गजानन चंदिवाले, प्रदीप मेश्राम, मंगेश पटले, रोशन जैन उपस्थित होते.