१० वर्षांपासून रखडलेल्या बोअरवेलचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2017 12:44 AM2017-07-08T00:44:13+5:302017-07-08T00:44:13+5:30
तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गल्लीत तयार झालेल्या सार्वजनिक बोअरवेलचे येथील समाजबांधवांनी लोकसहभागातून लोकार्पण केले.
लोकसहभाग : गरजेच्या ठिकाणीच केले खोदकाम
लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गल्लीत तयार झालेल्या सार्वजनिक बोअरवेलचे येथील समाजबांधवांनी लोकसहभागातून लोकार्पण केले. जनतेच्या सदर स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
भारतीय जीवन विमा निगमच्या वतीने वडेगाव विमा ग्राम घोषित करण्यात आले. त्याअंतर्गत निगमतर्फे ग्रामपंचायतीमार्फत बोअरवेल देण्यात आले. सदर बोअरवेल अत्यंत निकडीच्या ठिकाणी खोदण्यास ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला. त्यासाठी स्थानिक वार्ड क्रं. २ येथे प्रल्हाद बिंझाडे यांनी आपल्या मालकीची जागा उपलब्ध करुन दिली. त्यामुळे येथील जनतेची मागील १० वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास गेली. यामुळे अत्यंत आनंदीत झालेल्या नागरिकांनी लोकसहभागातून बोअरवेलचे रितसर वास्तुपूजन केले.
यावेळी लोकांनी अन्न व अर्थदान करुन आपला सहभाग नोंदविला. तसेच उपस्थित जनतेला भोजन देण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंच तुमेश्वरी बघेले, उपसरपंच सुधीर मेश्राम, डॉ. ओंकार लांजेवार, बाळकृष्ण सोनवाने, नंदू गुरव, वाघाडे, सुनिल साठवणे, सुशील भेलावे, तिरयू भेलावे, चाचेरे, नरेंद्र धपाडे, सुकराम भेलावे, नत्थु भेलावे, मधुकर भेलावे, अनंतराम भेलावे, महादेव बाजनवारे, रुपलाल वाघाडे, लोकराम भेलावे, दिगंबर भेलावे, लिलाधर बघेले, मंजुळा लांजेवार व नागरिक उपस्थित होते. सदर बोअरवेलमुळे जनतेची पाण्यासाठीची पायपीट थांबली आहे. जनतेच्या लोकसहभागातून बोअरवेल वास्तुपूजन उपक्रमाची सर्वत्र चर्चा केली जात आहे.