सरपंच, सचिवाला पदमुक्त करा
By admin | Published: October 7, 2016 01:51 AM2016-10-07T01:51:07+5:302016-10-07T01:51:07+5:30
सरपंचपदी आरूढ झालेले लोक अमूक माझ्या पक्षाचा आहे म्हणून त्याला पात्र नसताना लाभ देऊ व दुसरा
ग्रामसभेत ठराव : १० कुटुंबांना नऊ वर्षापासून दाखले दिलेच नाही
गोंदिया : सरपंचपदी आरूढ झालेले लोक अमूक माझ्या पक्षाचा आहे म्हणून त्याला पात्र नसताना लाभ देऊ व दुसरा माझ्या पक्षाचा नाही म्हणून त्याला लाभ देणे सोडा दाखलाही दिला जात नाही. ही बाब न्यायसंगत नाही. त्यासाठी त्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण अडले व इतरही कामे खोळंबले असल्याचा आरोप करीत २ आॅक्टोंबरच्या ग्रामसभेत या अराजकेतने वागणाऱ्या रतनाराच्या सरपंच व सचिवाला पदमुक्त करण्याचा ठराव ग्रामसभेत पारीत करण्यात आला, अशी माहिती येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
रतनारा येथील सरपंच रंजीता मेश्राम, ग्रा.पं.सदस्य धनपाल धुवारे व सचिव पृथ्वीराज कोल्हटकर या तिघांनी गावात अराजकता पसरविली आहे. सन २०११ च्या सर्वेक्षण यादीनुसार ५६३ लोकांची नावे घरकूल यादीत होती. परंतु सरपंच व सचिवाने ग्रामसभेत पात्र, अपात्र लाभार्थ्यांची जनवड न करता मनमर्जीने आपल्या संबधीत धनाढ्यांची नावे त्या घरकूल यादीत टाकली आहेत. गरजूवंत सोहन ढेकवार, अर्जुन ढेकवार इतर लोकांना घरकूलाची गरज असताना त्यांची नावे डावलण्यात आली. सरपंचने स्वत:च्या श्रीमंत भावाचे नाव घरकूलाच्या यादीत टाकले आहे, असा आरोप गावकऱ्यांचा आहे. गावात मतदान करणे, रेशन घेणे हा लाभ १० कुटुंबाना दिला जातो. परंतु त्यांना जन्म किंवा मृत्यूचा दाखल न देणे, रहिवासी दाखला न देणे हे काम मागील नऊ वर्षापासून होत असल्याने या अज्ञानी गरिब लोकांची हाक कुण्याही अधिकाऱ्याने ऐकले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेचे सन २०११-१२ या वर्षात ४ लाखाचे बक्षीस मिळाले होते. परंतु तंटामुक्त बक्षीसाचा हिशेब ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी दिला नाही.
सरपंच व उपसरपंच ह्या दोन्ही आशा कार्जकर्ती आहेत. एकच व्यक्ती दोन पदाचा लाभ घेत आहगत तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केली यात असल्याचा आरोप रामप्रसाद लिल्हारे, मयाराम दसरे, रामप्रसाद कनसरे, गणेश लिल्हारे, मुन्नालाल लिल्हारे, हौसलाल चिखलोंडे, बेनिराम लिल्हारे, घनश्याम लिल्हारे, भोजराज परतेती, शीला लिल्हारे व इतर गावकऱ्यांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)