वादळीवाऱ्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा

By admin | Published: May 19, 2017 01:35 AM2017-05-19T01:35:07+5:302017-05-19T01:35:07+5:30

२१ मे २०१६ रोजी आलेल्या वादळीवाऱ्यामधील नुकसानग्रस्तांना राज्य शासनाकडून अखेर आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

Relief to the victims of storm storms | वादळीवाऱ्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा

वादळीवाऱ्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा

Next

२.७० कोटींचा निधी मंजूर : विशेष बाब म्हणून मदत जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : २१ मे २०१६ रोजी आलेल्या वादळीवाऱ्यामधील नुकसानग्रस्तांना राज्य शासनाकडून अखेर आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने विशेष बाब म्हणून २.७० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत शासनाकडून ६ मे रोजी तसे आदेश काढण्यात आले आहेत. शासनाच्या निर्णयामुळे नऊ हजार ३३४ नुकसानग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.
मागील वर्षी २१ मे रोजी आलेल्या वादळीवाऱ्यात गोंदिय विधानसभा क्षेत्रात सर्वाधीक नुकसान झाले होते व यात गोंदियातीलच सुमारे तीन हजार २५६ लोकांचे नुकसान झाले होते. तर जिल्ह्यातील नऊ हजार ३३४ लोकांना या वादळीवाऱ्याचा फटका बसला होता. मात्र शासकीय नियमानुसार एका दिवसात ६५ मीमी. पाऊस पडल्यावरच शासकीय मदत देण्याचा नियम आहे. तर वादळीवाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीत मदत देण्याचा नियम नियमावलीत स्पष्ट नाही. तरिही आमदार अग्रवाल यांनी या तुफानामुळे झालेल्या नुकसानीची स्वत: दौरा करून पाहणी केली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या नुकसानीचे विवरण शासनाकडे पाठवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतददा पाटील यांच्याकडे मदतीची मागणी केली होती.
मागील एक वर्षापासून या विषयाला घेऊन आमदार अग्रवाल यांनी विधानसभेच्या सर्वच सत्रात ह विषय उचलून धरला होता. मात्र मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून प्रस्तावीत मदत निधी वित्त विभागाकडन नामंजूर करण्यात आला. यावर आमदार अग्रवाल यांनी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे य विषयाला घेऊन अनेकदा भेट घेतली. परिणामी विशेष बाब म्हणून मंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना मदतीसाठी २.७० कोटींचा निधी मंजूर केला. आदेश काढण्यात आले असून नुकसानग्रस्तांना मदत निधीचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे.

Web Title: Relief to the victims of storm storms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.