वाघ नदीच्या पात्रात मृत कोंबड्या-बकºयांचे अवशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:31 AM2017-11-16T00:31:48+5:302017-11-16T00:33:17+5:30
शहरातील मांस विक्रेते त्यांच्या दुकानातील केरकचरा सालेकसा-आमगाव मार्गावरील वाघ नदीच्या पात्रात सर्रासपणे टाकत आहेत.
राजीव फुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : शहरातील मांस विक्रेते त्यांच्या दुकानातील केरकचरा सालेकसा-आमगाव मार्गावरील वाघ नदीच्या पात्रात सर्रासपणे टाकत आहेत. परिणामी नदीचे पाणी दूषीत होत असून याच पाण्याचा आमगाव शहरवासीयांना पुरवठा केला होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
शासन आणि प्रशासनातर्फे एकीकडे नदी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. त्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. ऐवढेच नव्हे तर व्यापकस्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणामुळे नदी प्रदूषीत केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे. आमगाव लगत असलेल्या वाघ नदीमध्ये येथील काही मांस विक्रेते त्यांच्या दुकानातील शिल्लक केरकचरा व मृत कोंबड्या-बकºयांचे मांस नदीमध्ये टाकत असल्याचे बोलल्या जाते. लोकमत प्रतिनिधीने नदी पात्राला भेट देवून पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात केरकचरा आणि मृत कोंबड्या-बकºयांचे अवशेष आढळले. केवळ मांस विक्रेतेच नव्हे तर इतरही काही लोक केरकचरा नदीच्या पात्रात टाकत असल्याची माहिती आहे. परिणामी नदीचे पाणी प्रदूषीत होत आहे. शिवाय या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. आमगाव येथील नागरिकांनी याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले. मात्र त्याचा कसलाच उपयोग झाला नाही. नदीच्या पात्रात केरकचरा आणि मृत कोंबड्या-बकºया टाकणाºयांवर प्रशासनातर्फे कुठलीच कारवाई केली जात नसल्याने त्यांची देखील हिम्मत वाढल्याचे चित्र आहे.
आमगाववासीयांचे आरोग्य धोक्यात
बाघ नदीच्या पात्रातूनच आमगाववासीयांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र त्याच पात्रातील पाणी केरकचºयामुळे दूषीत होत आहे. त्यामुळे आमगाववासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक झनक बहेकार यांनी तहसीलदार राठोड यांची भेट घेवून निवेदन दिले. केरकचरा टाकणाºया संबंधीत मांस विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाने अद्यापही कुठली कारवाई केली नाही.
आंदोलनाचा इशारा
येथील वाघ नदीच्या पात्र काही मांस विक्रेते केरकचरा टाकत असल्याने नदीचे पाणी दूषीत होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची वेळीच दखल घेवून संबंधितांवर त्वरीत कारवाई करावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमगाववासीयांनी दिला आहे.
वाघ नदीच्या पात्रात काही मांस विक्रेते मृत कोंबड्या बकºयांचे अवशेष आणि केरकचरा टाकत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेने याची त्वरीत दखल घेवून नदीपात्र स्वच्छ करुन संबंधितांवर कारवाई करावी.
विजय शिवणकर, माजी जि.प.अध्यक्ष
या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून लवकर नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. संबंधित मांस विक्रेत्यांना नोटीस देवून कारवाई केली जाईल.
एस.एल.नागपुरे, नायब तहसीलदार,