खासगी रुग्णालयांना दिलेले रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले परत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 05:00 AM2021-09-08T05:00:00+5:302021-09-08T05:00:25+5:30

अतिरिक्त पैसे मोजून देखील अनेकांना वेळेवर रेमडेसिविर इंजेक्शन न मिळाल्याने काही रुग्णांचा जीवसुद्धा गेला होता. खासगी रुग्णालयांना सुद्धा रेमडेसिविर इंजेक्शन मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे शासनाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून त्याचे खासगी रुग्णालयांना वितरण करण्यात आले होते. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले होते.

Remedicivir injections given to private hospitals returned! | खासगी रुग्णालयांना दिलेले रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले परत !

खासगी रुग्णालयांना दिलेले रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले परत !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. अतिरिक्त पैसे मोजून देखील अनेकांना वेळेवर रेमडेसिविर इंजेक्शन न मिळाल्याने काही रुग्णांचा जीवसुद्धा गेला होता. खासगी रुग्णालयांना सुद्धा रेमडेसिविर इंजेक्शन मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे शासनाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून त्याचे खासगी रुग्णालयांना वितरण करण्यात आले होते. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले होते. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर सर्वाधिक खासगी रुग्णालयात झाला होता. 
या इंजेक्शनचे खासगी रुग्णालयांना वाटप केल्यानंतर त्यांनी किती इंजेक्शनचा वापर केला आणि किती इंजेक्शन शिल्लक राहिले याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देऊन उर्वरित इंजेक्शन परत करायचे होते. एक दोन मोजकी खासगी रुग्णालये वगळता सर्वांनीच ते परत केले. 

तिसऱ्या लाटेसाठी नियोजन 
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात असून त्या दृष्टीने ऑक्सिजन, आयसीयू बेड, रेमडेसिविर इंजेक्शन, कोविड केअर सेंटर, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच त्या दृष्टीने जिल्हा आरोग्य विभागाची यंत्रणादेखील कामाला लागली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, नागरिकांना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. 

...तर होणार कारवाई 
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये यासाठी त्याचे वितरण योग्य पद्धतीने केले.
खासगी रुग्णालयांना दिलेल्या इंजेक्शनचा किती वापर केला, किती इंजेक्शन शिल्लक राहिले. 
शिल्लक राहिलेले इंजेक्शन त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परत केले.ज्या ते परत केले नाही त्यांना कारवाईची नोटीस बजाविण्यात येणार होती. 
मात्र, जिल्ह्यातील सर्वच खासगी रुग्णालयांनी ते वेळेत परत केले त्यामुळे कारवाईची वेळ आली नाही. 
 

Web Title: Remedicivir injections given to private hospitals returned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.