शिक्षकांच्या समस्या निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 09:34 PM2018-09-10T21:34:57+5:302018-09-10T21:35:13+5:30
शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यात याव्या. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सालेकसा शाखेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी एस.जी.वाघमारे यांच्याशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपुरी : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यात याव्या. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सालेकसा शाखेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी एस.जी.वाघमारे यांच्याशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले.
या वेळी दिलेल्या निवेदनातून वेतनवाढ थांबविलेल्या चटोपाध्याय निवड श्रेणी पात्र शिक्षकांना त्वरित वेतनवाढ लावणे,चटोपाध्याय निवड श्रेणीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविणे, माहे मे २०१६ ते जून २०१८ पर्यंतचे डीसीपीएसचे चालान व शेड्यूल पाठविणे, माहे एप्रिल २०१६ ते मार्च २०१२ पर्यंतचे शेड्यूल पाठविणे,जीपीएफ व डीसीपीएसची पावती मिळणे, चटोपाध्याय मंजूर होवून आलेल्या शिक्षकांना वेतन निश्चिती करुन वेतन वाढ लावणे, पानगाव शाळेचे प्रकरण निकाली काढणे, एलआयसी २०१२-२०१३ मध्ये असलेले तफावत दूर करणे, प्रत्येक महिन्याचे पगार बिल वेळेवर पाठविणे, गणवेशाची रक्कम कमी मिळलेल्या शाळांना उर्वरित रक्कम पुरविणे, इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन वाघमारे यांनी दिले.
याप्रसंगी वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम.एल.मेश्राम, शिक्षण विस्तार अधिकारी एन.पी. चिखलोंडे, केए.स.धुवाधपाडे, शिक्षण अधीक्षक एस.आर. वंजारी, वरिष्ठ सहायक वंदना खजुरीया, कनिष्ठ सहायक डी.एस.फरकुंडे, टेंभरे व तोषिक उके उपस्थित होते. शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष सतिश दमाहे, कार्याध्यक्ष टी.आर. लिल्हारे, डी.एन. गोलीवार, ए.बी. बोरकर, पाटील, एम.पी. म्याकलवार, पी.एम. फरकुंडे, सुरेश चव्हाण, गजभिये, सुनील बैठवार, बी.झेड. माहुले, टी.एन. बैठवार, के.एन. बनोठे, डी.बी. बरैया, कृष्णा लिल्हारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एम.पी. म्याकलवार यांनी तर आभार जयेश लिल्हारे मानले.