शिक्षकांच्या समस्या त्वरित निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 09:22 PM2018-02-24T21:22:27+5:302018-02-24T21:22:27+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा अर्जुनी मोरगाव शिक्षक समस्या निवारण सहविचार सभा पं.स. कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे नुकतीच पार पडली.
ऑनलाईन लोकमत
अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा अर्जुनी मोरगाव शिक्षक समस्या निवारण सहविचार सभा पं.स. कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे नुकतीच पार पडली. यात पंचायत समिती स्तरावरील शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्येवर चर्चा करण्यात आली.
सभेला गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार, गटशिक्षणाधिकारी टी.बी. भेंडारकर, वरिष्ठ शि.वि. अधिकारी सिरसाटे तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक समितीचे पदाधिकारी तालुका शिक्षक नेते रमेश गहाणे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद बडोले, तालुका अध्यक्ष सिद्धार्थ खोब्रागडे, कार्याध्यक्ष कैलास हाडगे, राजेश मरघडे यांच्या नेतृत्वात शिक्षकांच्या विविध समस्या मांडण्यात आल्या. मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बहुतांश शिक्षकांच्या जीपीएफ पावत्या अप्राप्त असून त्याकरिता पं.स.कडून संबंधित प्राप्त पावत्या मिळण्यासाठी जि.प.कडे कार्यवाही करावी, आॅफलाईन वेतन करण्याची कार्यवाही त्वरित करावी, वेतन वाढीनुसार प्रोत्साहन नक्षल भत्यात वाढ करावी, मागील थकबाकी काढण्यात यावी, मूळ व दुय्यम सेवापुस्तिका सर्व नोंदिसह पूर्ण करण्यात यावे, शालेय पोषण आहार, सामान, इंधन, भाजीपाला व स्वयंपाकी मानधन त्वरित मिळावे, प्रलंबित असलेले आयकर संदर्भातील कार्य पूर्ण करावे, निवडश्रेणी प्रशिक्षणास पात्र असलेल्या शिक्षकांची यादी जि.प.कडे पाठवावे, मराठी-हिंदी भाषा सूट, पूर्वपरवानगी कार्याेत्तर परवानगी, संगणक सूट, स्थायी कर्मचारी मंजुरीस्तव प्रस्ताव जि.प.के त्वरित पाठवावे, डीसीपीएस पावती मिळण्यासाठी कार्यवाही करावी, चटोपाध्याय व निवडश्रेणी मंजूर यादीतील शिक्षकांचे वेतन निश्चितीकरिता प्रस्ताव जि.प.कडे पाठवावे, उपस्थिती भत्ता व इतर अनुदान शाळांना त्वरित मिळावे आदी मागण्यांवर या वेळी चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी पी.बी. मोहबंशी, विठोबा रोकडे, गोवर्धन लंजे, पुनाराम जगझापे, भुषण लोहारे, व्ही. डी. गभणे, देवदास नाईक, मनोहर मोटघरे, आर.डी. साखरे, अर्जुन गोफणे, विजय शहारे, प्रशांत चव्हाण, सुभाष मानकर, रविंद्र वालदे, घनशाम ब्रोद्रेकर, सुरेश ब्राम्हणकर, भवेश श्हारे, विक्रमसिंह ठाकूर, मेश्राम, संदेश शेंडे, युवराज नागपुरे, प्रकाश सांगोडे, राजेंद्र राखडे, ज्ञानेश्वर कोल्हे, रेवानंद उईके, ज्ञानेश्वर कापगते, गोबाडे, मुंगमोडे, तागडे, राधाकिसन नेवारे, राजेंद्र चांदेवार, धनराज कापगते, भोजेंद्र नेवारे, सोविंदा शहारे, गिरधर नाकाडे, केशव सडमाके तसेच समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.