काढला ३.९ लाख घनमीटर गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 09:48 PM2019-02-19T21:48:38+5:302019-02-19T21:49:23+5:30
सिंचनाअभावी शेतकऱ्यांचे पीक अडचणीत येऊ नये यासाठी शासनाने माजी मालगुजारी तलावांचा पुनरुज्जीवन कार्यक्रम आखला. सन १७-१८ या वर्षात ३७९ तलावांमधून गाळ काढायचा होता. यातील ९४ तलावांतील संपूर्ण गाळ काढण्यात आला असून १२० तलावांमधील तलावात गाळ काढण्याचे काम अजून सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सिंचनाअभावी शेतकऱ्यांचे पीक अडचणीत येऊ नये यासाठी शासनाने माजी मालगुजारी तलावांचा पुनरुज्जीवन कार्यक्रम आखला. सन १७-१८ या वर्षात ३७९ तलावांमधून गाळ काढायचा होता. यातील ९४ तलावांतील संपूर्ण गाळ काढण्यात आला असून १२० तलावांमधील तलावात गाळ काढण्याचे काम अजून सुरु आहे. ३१ जानेवारीपर्यंत ३ लाख ९ हजार ७०६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
गोंदिया तालुक्यातील १८ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून २१ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ६८ हजार ५४७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. गोरेगाव तालुक्यातील १८ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आले असून १८ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ७६ हजार ५१० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तिरोडा तालुक्यातील १७ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १८ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात २८ हजार ४६४ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. आमगाव तालुक्यातील १० तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून ११ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात १९ हजार ५५७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
देवरी तालुक्यातील १५ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १५ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात १९ हजार ११ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील १२ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १३ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ५८ हजार १४९ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. सालेकसा तालुक्यातील ४ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १० तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ११ हजार ९१९ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एकही तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला नाही. १४ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात २७ हजार ५४९ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. अशाप्रकारे, जिल्ह्यातील ९४ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १२० तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ७०६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
३८७ तलाव करतात शेतकऱ्यांना समृद्ध
शासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून माजी मालगुजारी तलावांचा पुनरज्जीवन कार्यक्रम सुरु केला. त्यात सन २०१६-१७ या वर्षात ३८७ तलावामधील ८ लाख ११ हजार ३० घनमीटर गाळ काढून शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देण्यासाठी हे तलाव सज्ज झाले आहेत.