ग्राहकांच्या तक्रारी निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:56 AM2017-07-18T00:56:22+5:302017-07-18T00:56:22+5:30

वीज ग्राहकांच्या तक्रारींच्या सोडवणूक करता यावी यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गोंदिया परिमंडळाकडून सडक-अर्जुनी येथे ....

Removed customer complaints | ग्राहकांच्या तक्रारी निकाली

ग्राहकांच्या तक्रारी निकाली

googlenewsNext

अधिकाऱ्यांनी ऐकल्या तक्रारी : महावितरणचे तक्रार निवारण शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वीज ग्राहकांच्या तक्रारींच्या सोडवणूक करता यावी यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गोंदिया परिमंडळाकडून सडक-अर्जुनी येथे महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात ग्राहक तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महावितरणचे गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता जे.एम. पारधी व गोंदिया प्रविभागाचे अधीक्षक अभियंता एल.एम. बोरीकर यांच्या मार्गदर्शनात देवरी विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम.वाकडे व सडक-अर्जुनी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नादेव एस. शेख यांच्यातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व यात अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेत त्यांना निकाली काढल्या.
या ग्राहक तक्रार निवारण शिबिरामध्ये नगराध्यक्ष रिता लांजेवार, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, जि.प. सदस्य रमेश चुरे, पं.स.सभापती डॉ. काशिवार, सुधीर विनायक शिवणकर, सरपंच शिवाजी गहाणे, नाजुकराम झिंगरे, अरुण लेदे, प्रल्हाद वरठे, बुधराम लंजे, जगन लंजे, जगदीश उपरीकर व इतर वीज ग्राहक तसेच महावितरणचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
ग्राहकांनी या शिबिरामध्ये सडक-अर्जुनी तालुक्यातील कमी दाबाचा विज पुरवठा, नादुरुस्त मिटर, महावितरण आपल्या दारी योजनेंतर्गत देण्यात आलेल्या विज जोडणीचे लघुदाब वाहिनीची प्रलंबित कामे, अतिभारीत रोहित्रे इत्यादी तक्रारी मांडल्या. या तक्रारींबाबत अधीक्षक अभियंता बोरीकर यांनी सडक-अर्जुनी तालुक्यात महावितरणतर्फे प्रस्तावीत उपकेंद्रे, रोहित्रे व लघुदाब, उच्चदाब वाहिनी इत्यादी कामांची माहिती दिली व कमी दाबाच्या तक्रारीचे लवकरच निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
शिबिरामध्ये कार्यकारी अभियंता वाकडे यांनी, कृषीपंपासाठी शासनाद्वारे जाहिर केलेल्या सौर पंपाच्या योजना तसेच ग्राहकांसाठी महावितरणतर्फे देण्यात येणाऱ्या मोबाईल अ‍ॅप बाबत माहिती दिली.
तसेच ग्राहकांनी मोबाईल अ‍ॅपचा जास्तीत-जास्त वापर करुन महावितरणाच्या विविध सेवांचा उपयोग करण्यासाठी आवाहन केले. शिबिरामध्ये उपस्थित झालेल्या काही तक्रारींचे निवारण लगेच करण्यात आले व काही तक्रारींचे निवारण लवकरच करण्यासाठी बोरीकर यांनी सडक-अर्जुनीचे उपकार्यकारी अभियंत्यांना निर्देश दिले.
महावितरणतर्फे तालुकास्तरावर ग्राहक तक्रार निवारण शिबिराचे आयोजन प्रत्येक तालुक्यात करण्यात येणार आहे. या शिबिरातून ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे शिबिराचा जास्तीत-जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणर्फे जिल्ह्यातील वीज ग्राहकांना करण्यात आले आहे.

Web Title: Removed customer complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.