लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांना मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 03:57 PM2024-10-30T15:57:33+5:302024-10-30T15:59:17+5:30

Gondia : केव्हा प्रति अर्ज ५० रुपये प्रमाणे मिळणार होते पैसे

Remuneration to Anganwadi Servants who have filled the application form of Ladaki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांना मानधन

Remuneration to Anganwadi Servants who have filled the application form of Ladaki Bahin Yojana

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
मुख्यमंत्री माझी लाडकी : बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे ५० रुपये देऊ, असा शासन निर्णय ही योजना सुरू झाली तेव्हा घेण्यात आला होता. लाडक्या बहिणींना चक्क पाच हप्ते देखील मिळाले. मात्र, ज्यांच्यामुळे लाडक्या बहिणींचे अर्ज दाखल झाले, त्या अंगणवाडी सेविकांना मात्र अद्यापही त्यांच्या हक्काचे प्रोत्साहनपर भत्त्याचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे हे पैसे अंगणवाडी सेविकांच्या हाती केव्हा पडणार? हे गुलदस्त्यातच आहे.


महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली. त्यानुसार दर महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होऊ लागले. या योजनेचा प्रतिसाद पाहता, ही मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. दोन महिने अर्ज भरल्यानंतरही अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यावर बोलण्यासाठी शासनाला वेळच नाही. दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी महिला सन्मान मेळावा आयोजित केला जात आहे. या योजनेच्या प्रसिद्धीसाठी शासन लाखो रुपये खर्च करीत आहे. मात्र, ज्यांच्यामुळे ही योजना यशस्वी झाली आहे, त्या अंगणवाडी सेविकांचा शासनाला विसर पडला आहे. दिवाळीपूर्वी तरी ही रक्कम मिळावी, अशी अंगणवाडी सेविकांची मागणी केली आहे. 


अर्ज भरण्याचे प्रत्येकी ५० रुपये मिळणार कधी? 
जुलै व ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच महिन्यांचे ७ हजार पाचशे रुपये जमा झाले. मात्र, अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना त्यांच्या हक्काचे ५० रुपयांप्रमाणे मिळणारे मानधन अजूनही मिळालेले नाही

Web Title: Remuneration to Anganwadi Servants who have filled the application form of Ladaki Bahin Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.