पांगडी जलाशयची दुरुस्ती करा
By admin | Published: May 6, 2017 12:58 AM2017-05-06T00:58:52+5:302017-05-06T00:58:52+5:30
पांगडी जलाशयमध्ये पाच ठिकाणी पाणी लिकेज होत आहे. त्यामुळे रबीचे पीक घेता आले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पांगडी जलाशयमध्ये पाच ठिकाणी पाणी लिकेज होत आहे. त्यामुळे रबीचे पीक घेता आले नाही. मागे खरीप हंगामामध्येही पाण्याची अडचण निर्माण झाली होती. कार्यकारी अभियंता यांना वारंवार लेखी तक्रार देवूनही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही.
याबाबत मुख्य कार्यकारी संचालक सुर्वे यांना तक्रार करण्यात आली आहे. पांगडी जलाशयचे पाणी यावर्षी शेतकऱ्यांना मिळाले नाही तर शेतकरी मोठ्या प्रमाणात जेल भरो आंदोलन करतील, असा इशारा त्यांना निवेदनातून देण्यात आला आहे. यावर त्यांनी अभियंता सोनटक्के यांना तत्काळ सूचना दिली. सोनटक्के यांनी पांगडी जलाशयाची पाहणी केली. शेतकऱ्यांना पाऊस येण्याआधी सदर लिकेज दुरूस्त करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी माजी जि.प. सदस्य संजयसिंह टेंभरे, कार्यकारी अभियंता एन.के. ढोरे, उपविभागीय अभियंता चौरागडे, शाखा अभियंता बनसोडे, जीवराज शरणागत, डॉ. गंगाराम पटले, भूमेश दिहारी, मारगाये, डॉ. मुन्ना तुरकर, उपसरपंच रामू शरणागत,पटले उपस्थित होते.