उपवर्गीकरणाचा निर्णय कायदा करून त्वरित रद्द करा; दलित, आदिवासी, ओबीसी संघटना रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 03:16 PM2024-08-22T15:16:58+5:302024-08-22T15:22:34+5:30

Gondia : जिल्ह्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; शाळा, महाविद्यालयांना सुटी

Repeal the sub-classification decision forthwith by enactment; Dalit, tribal, OBC organizations on the streets | उपवर्गीकरणाचा निर्णय कायदा करून त्वरित रद्द करा; दलित, आदिवासी, ओबीसी संघटना रस्त्यावर

Repeal the sub-classification decision forthwith by enactment; Dalit, tribal, OBC organizations on the streets

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेल्या 'भारत चंद'ला बुधवारी (दि. २१) जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारने हा निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून कायदा करावा या मागणीसाठी दलित, आदिवासी, ओबीसी व मुस्लीम संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या, गोंदिया शहरासह सर्वच तालुक्यांत शाळा, कॉलेजला सुटी देण्यात आली होती. व्यापारी संघटनांनीसुद्धा बंदला समर्थन दिल्याने शहरातील बाजारपेठ सकाळपासूनच बंद होती.


सकाळी नऊपासून शहराच्या विविध भागांतून हजारोंच्या संख्येने नागरिक मोटारसायकल रैली, पदयात्रा काढत प्रशासकीय इमारतीसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर एकत्र आले. येथे झालेल्या सभेतून सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारवर सडकून टीका करण्यात आली. अनुसूचित जातीसाठी असलेले आरक्षण देताना त्यात वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील आरक्षणाचा लाभ योग्य घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या वर्गातही 'क्रिमिलेयर' लावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे या विरोधात दलित आणि आदिवासी संघटनांनी बुधवारी 'भारत बंद'ची हाक दिली. 


सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली. या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे तसेच ओबीसीची जातनिहाय जनगणना करून त्यांनाही लावलेली क्रिमिलेयरची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी आरक्षण बचाव संघर्ष समितीने केली.


भारत बंदमध्ये विविध संघटनांचा समावेश
या भारत बंदला भारतरत्न डॉ. बाबासाहेच आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सय समिती, आदिवासी पीपल्स फेडरेशन, मुस्लीम मायनॉरिटी ट्रस्ट, ओबीसी संघर्ष कृती समिती, संघर्ष वाहिनी, आर.टी. फाउंडेशन, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, चर्मकार महासंघ, संविधान मैत्री संघ, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, भारत मुक्ती मोर्चा, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी, मुस्लीम जमात गोंदिया, ओबीसी अधिकार मंच, ओबीसी सेवा संघ, महात्मा फुले समता परिषद, ओचीसी जनमोर्चा, बहुजन युवा मंच यांच्यासह विविध दलित आणि आदिवासी ओबीसी संघटनांसह बहुतांश विरोधी पक्षांनी पाठिंबा देत सहभाग नोंदविला.


बंदमुळे एसटीच्या १९४ फेऱ्या रद्द
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील बससेवा ठप्प होती. जिल्ह्यातील २७३ फेऱ्यांपैकी ११४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर दुपार पासून सुरु झालेल्या ७९ फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. गोंदिया-ना- गपूर बससेवा सकाळी १० वाजल्यानंतर सुरू करण्यात आली. गोंदिया-आमगाव, आमगाव-देवरी, गोंदिया-बालाघाट या एसटी फेया बंद होत्या. १९४ फेऱ्या गोंदिया आगाराला रद्द कराव्या लागल्या, अशी माहिती वाहतूक नियंत्रक जगन्नाथ बोकळे यांनी दिली आहे.

Web Title: Repeal the sub-classification decision forthwith by enactment; Dalit, tribal, OBC organizations on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.