चुरडी हत्याकांडाचा तपास सीआयडीला द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:31 AM2021-09-26T04:31:16+5:302021-09-26T04:31:16+5:30
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील ग्राम चुरडी येथील रहिवासी रेवचंद बिसेन यांच्यासह कुटुंबातील चौघांची मंगळवारी (दि.२१) हत्या करण्यात आली. याप्रकरणी ...
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील ग्राम चुरडी येथील रहिवासी रेवचंद बिसेन यांच्यासह कुटुंबातील चौघांची मंगळवारी (दि.२१) हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंब प्रमुखाने हत्या करून स्वतः गळफास घेतली असल्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र स्वत:च्या कुटुंबीयांची हत्या कशी काय करू शकतो, हे न पटणारे असल्याने या हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी सीआय़डीची नेमणूक करून आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेने केली आहे. यासाठी महासभेच्यावतीने उपविभागीय अधिकारी, तपासी अधिकारी व पोलीस निरीक्षक योगेश पवार यांना शुक्रवारी (दि.२४) निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन देताना, राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष मुरलीधर टेंभरे, संघटन सचिव खेमेंद्र कटरे, सदस्य अॅड. रुपेंद्र कटरे, पवार प्रगतिशील मंचचे संचालक महेंद्र बिसेन, तिरोडा पोवार जागृती प्रगतिशील संस्था अध्यक्ष बाबा भैरम, हंसराज रहांगडाले, तारेंद्र रहांगडाले, अॅड. देवेंद्र चौधरी, अनुप बोपचे, ओम पटले, रमेश सोनवामे, शीला गौतम, अनुप बोपचे, ओम पटले, शर्मिला राणे, मंजू कटरे, मीनाक्षी ठाकरे, सुनीता गौतम, दीपा पटले व अन्य समाजबांधव उपस्थित होते.