कायद्याची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:51 AM2018-03-21T00:51:10+5:302018-03-21T00:51:10+5:30
आजच्या आधुनिक युगात शिक्षणाचे प्रमाण वाढले त्याचबरोबर ग्रामीण भागाचा विकास ही आवश्यक आहे. परंतु भांडण तंट्यांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला बाधा निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : आजच्या आधुनिक युगात शिक्षणाचे प्रमाण वाढले त्याचबरोबर ग्रामीण भागाचा विकास ही आवश्यक आहे. परंतु भांडण तंट्यांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला बाधा निर्माण झाली आहे. त्याकरिता कायद्याची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचावी याकरिता शासनाच्या माध्यमातून फिरते लोकअदालत ग्रामीण भागामध्ये पोहोचविण्यात आले आहे. असे प्रतिपादन फौजदारी व दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.ए. साठे यांनी केले.
तालुक्यातील ग्राम सौंदड येथे घेण्यात आलेल्या फिरते लोक अदालतमध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. बन्सोड, प्रा.आर.के. भगत, अॅड.आर.के. लंजे, ठाणेदार किशोर पर्वते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गायत्री इरले, उपसरपंच सुनील राऊत, तंटामुक्त अध्यक्ष चरणदास शहारे उपस्थित होते.
डव्वा येथील लोकअदालतच्या अध्यक्षस्थानी तिरोडा न्यायालयाचे न्यायाधीश वी.सी. बछले होते. मार्गदर्शक म्हणून अॅड. रहांगडाले, प्रा.आर.के. भगत, सरपंच पुष्पमाला बडोले, उपसरपंच चेतन वडगाये, रूपविलास कुरसुंगे, अनिल बिलीया, विलास चव्हाण, ग्रामविस्तार अधिकारी नागदेवे उपस्थित होते.
चिखली येथे घेण्यात आलेल्या फिरत्या लोक अदालतच्या अध्यक्षस्थानी व्ही.ए.साठे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.आर.के. भगत, अॅड. बन्सोड, अॅड. गिºहेपुंजे, अॅड. रहांगडाले, पीएसआय चंदेल, सरपंच सुधाकर कुर्वे, खुशाल भेंडारकर, शालीकराम शहारे, पोलीस पाटील बडोले, सुभाष मेश्राम, भुवनलाल भोयर उपस्थित होते.
फिरत्या लोक अदालतीमध्ये सौंदड येथील २, डव्वा येथील २ व चिखली येथील २ असे एकूण ६ प्रकरण तडजोडीत निकाली काढण्यात आले. तसेच गावकऱ्यांना महिलांविषयी कायदे, सायबर क्राईम, मनोरंजनाचे कायदे अशा विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.