प्रकल्पग्रस्तांचे परिणय फुके यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 08:30 PM2018-12-27T20:30:22+5:302018-12-27T20:30:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रावणवाडी : गोंदिया तालुक्यातंर्गत येणाऱ्या रावणवाडी परिसरातील सिरपूर, मुरपार, कलारीटोला, चारगाव, घिवारी, सावरी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी ...

Representation of Project Affected Persons | प्रकल्पग्रस्तांचे परिणय फुके यांना निवेदन

प्रकल्पग्रस्तांचे परिणय फुके यांना निवेदन

Next
ठळक मुद्देभूसंपादन कायद्याचे उल्लंघन : योग्य मोबदला देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
रावणवाडी : गोंदिया तालुक्यातंर्गत येणाऱ्या रावणवाडी परिसरातील सिरपूर, मुरपार, कलारीटोला, चारगाव, घिवारी, सावरी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी रजेगाव काटी उपसा सिंचन योजनेकरीता लघु पाटबंधार विभागाने संपादित केल्या.मात्र जमिनीचे संपादित करताना भूसंपादन कायद्याचे उल्लघंन करण्यात आले असून अद्यापही काही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न मिळाला नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आ.परिणय फुके यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या वेळी दिलेल्या निवेदनातून मध्यम प्रकल्प पाटबंधारे विभागाने रजेगाव काटी उपसा सिंचन योजनेकरीता शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी भूसंपादन कायद्यान्वये संपादित करणे गरजेचे होते. मात्र या विभागाने नियम धाब्यावर बसून जमिनी अधिग्रहीत केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केली आहे.
यामुळे मागील १० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी न्यायासाठी या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहेत. त्यामुळे शासनाने प्रकरणाची चौकशी करुन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य न्याय व मोबदला देण्याची मागणी या वेळी दिलेल्या निवेदनातून केली. आ. फुके यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकूण घेत यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात माजी भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आनंद तुरकर, सुरेश उईके, योगेश गाढवे, गोविंद नेवरे, धनिराम पटले, झामसिंग नैकाने, निरंजन कटरे, अशोक येवले उपस्थित होते.

Web Title: Representation of Project Affected Persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.