शेतकºयांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 09:19 PM2017-11-04T21:19:54+5:302017-11-04T21:20:06+5:30
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यावर कशा प्रकारे मात करता येईल यावर मार्गदर्शन करण्यासाठी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
केसलवाडा : दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यावर कशा प्रकारे मात करता येईल यावर मार्गदर्शन करण्यासाठी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार विजय रहांगडाले व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत सभेत त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन गावकºयांनी दिले.
मागील तीन ते चार वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे गाव व परिसरात शेतकºयांना सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तसेच यावर्षीसुद्धा सन २०१६-१७ या काळात भात पिकाची रोवणी न झाल्यामुळे गावातील अंदाजे ९७ टक्के शेतकºयांनी धानपिकाची लागवडच केली नाही. त्यामुळे शेतकºयांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर कशाप्रकारे मात करता येईल. याकरिता आ.रहांगडाले, जिल्हाधिकारी काळे यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना राबवता येतील. तसेच आणेवारीनुसार तालुका हा निकष न ठेवता फक्त गाव हा निकष ठेवून ज्या गावात खरोखरच दुष्काळ झाला आहे त्यातील शेतकºयांना पुरेशी कर्जमाफी व पीक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवून देऊ असे मार्गदर्शन केले.
सदर सभेमध्ये गावातील नागरिकांच्यावतीने आमदार तसेच जिल्हाधिकाºयांना नवनिर्वाचित सरपंच अनिता कुकडे यांच्याकडून निवेदन देण्यात आले.
सभेला खंडविकास अधिकारी, डीएफओ, वनविभाग, तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी तसेच ग्रामस्तरावरील नवनिर्वाचित सरपंच अनिता कुकडे, उत्तम कुकडे, बबन कुकडे, रविंद्रकुमार वहिले, रोहीत शहारे, शैलेष असाटी, मानिकराव झंझाड तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.