विदर्भ विकास परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By admin | Published: May 26, 2016 12:47 AM2016-05-26T00:47:45+5:302016-05-26T00:47:45+5:30
विदर्भ विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोनू राठोड यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी
शेतकऱ्यांच्या मागण्या : स्वामीनाथन लागू करा
गोंदिया : विदर्भ विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोनू राठोड यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी लोणकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले.
मागण्यांमध्ये स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, शेतकऱ्यांना समान व समतेची वागणूक देण्यात यावी, शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात यावी, ओलिताच्या सोयीसाठी सिंचन प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यात यावे, मागेल त्याला कृषी पंपासाठी त्वरित वीज पुरवठा करावा व अखंडित वीज पुरवठा करण्यात यावे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना व मुलांना सर्व प्रकारची सामाजिक सुरक्षा, आर्थिक मदत व उदरनिर्वाहासाठी भविष्याची हमी शासनाने द्यावी, शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण व मुलींच्या विवाहाची हमी देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी सुनील आंबेडारे, कशिश रंगारी, अॅड. अखिल श्रीवास्तव, अॅड. सुशील यादव, अॅड. चंद्रशेखर गजभिये, अॅड. सतीश सुखदेवे उपस्थित होते. (प्रतिनिधी)