वेतन पथक कार्यालयातून जीपीएफच्या पावत्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:57+5:302021-07-15T04:20:57+5:30

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ अशा तीन वर्षांच्या जीपीएफ पावत्या मिळालेल्या ...

Request for GPF Receipts from Pay Squad Office | वेतन पथक कार्यालयातून जीपीएफच्या पावत्यांची मागणी

वेतन पथक कार्यालयातून जीपीएफच्या पावत्यांची मागणी

Next

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ अशा तीन वर्षांच्या जीपीएफ पावत्या मिळालेल्या नाही. त्यामुळे मुलांचे लग्न, घराचे बांधकाम तसेच आपल्या जीपीएफ खात्यामध्ये किती रक्कम जमा झाली आहे हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे कठीण होत आहे. कर्मचाऱ्यांना मागील तीन वर्षांपासून पावती देण्यात आलेली नाही. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग हे जीवाची पर्वा न करता घनदाट, पहाडी व नक्षल प्रभावित क्षेत्रात काम करीत असतात. शासनाचे आदेश, नियमित कर्मचारी यांच्या जीपीएफ पावत्या वेतन पथकाने देण्याचे परिपत्रक असूनसुद्धा त्या वेळेवर दिल्या जात नाहीत. ही बाब गंभीर असल्याचे कर्मचारी संघटनेने म्हटले आहे. ३ वर्षांपासून पावत्यांचा क्रमांक न मिळण्यास बाबू व संगणक ऑपरेटर जबाबदार असून, निवेदनाद्वारे कार्यवाहीची मागणी काँग्रेस शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष डी. आर. गिरीपुंजे यांनी केली आहे.

Web Title: Request for GPF Receipts from Pay Squad Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.