देशी दारूबंदीकरिता निवेदन

By admin | Published: June 30, 2016 01:52 AM2016-06-30T01:52:13+5:302016-06-30T01:52:13+5:30

येथील नवीन देशी दारू दुकानास परवाना देण्यात येवू नये, या मागणीसाठी महिला बचत गटाच्या महिलांनी सरपंचाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी

Request for indigenous liquor | देशी दारूबंदीकरिता निवेदन

देशी दारूबंदीकरिता निवेदन

Next

एकोडी : येथील नवीन देशी दारू दुकानास परवाना देण्यात येवू नये, या मागणीसाठी महिला बचत गटाच्या महिलांनी सरपंचाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क अधिकारी यांना दिले निवेदन.
मागील दोन ते तीन वर्षांपासून एकोडी येथे रितेश जायस्वाल रा. मुरदाडा यांनी आपल्या खासगी जागेत घर बांधले. नंतर तयार करण्यात आलेल्या त्याच घरात देशी दारूच्या चिल्लर विक्रीचे दुकान सुरू करण्याकरिता ग्रामपंचायतला ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज केले होते. त्यानुसार जयस्वाल यांनी ७ मे २०१५ च्या तहकूब ग्रामसभेच्या ठराव-१ नुसार नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते.
परंतु ग्रामपंचायतच्या जुलै २०१५ च्या निवडणुकीत नवीन सरपंच यांच्या आयोजित प्रथम ग्रामसभेत १५ आॅगस्ट २०१५ ला दिलेला ७ मे २०१५ च्या तहकूब ग्रामसभेचा ठराव १५ आॅगस्ट २०१५ च्या ग्रामसभेत विषय-२ नुसार सर्वानुमते नामंजूर करण्यात आला. परंतु या नवीन उघडण्यात येणाऱ्या देशी दारू चिल्लर विक्री दुकानास गावातील महिलांचा मोठ्या प्रमाणात विरोध असून या प्रकरणाबाबत काही काही महिन्यांच्या अंतराने दारुबंदी राज्य उत्पादन शुल्क गोंदिया यांचे काही कर्मचारी एकोडी येथे येवून स्थानिक लोकांकडून देशी दारू दुकानासंबंधात न बोलता चौकशी करून जातात, असे अनेक लोकांकडून सांगण्यात येते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गावाच्या बाबतीत चुकीचा अहवाल सादर करुन खरी माहिती लपविण्याचा प्रकार होत आहे.
या संबंधाने एकोडी येथील सरपंच व पं.स. सदस्य यांच्या नेतृत्वात गावातील बचत गटाच्या महिला व नागरिक यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी व दारूबंदी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना देशी दारू चिल्लर विक्रीकरिता कोणत्याच प्रकारचा परवाना देण्यात येवू नये, याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात, महिला बचत गट व इतर महिलांचा मोठ्या प्रमाणात विरोध असून हे दुकान राज्य महामार्ग-२४९ ला लागून ३० फूट अंतरावर तयार करण्यात आलेल्या घरात सुरू करण्याबाबत जयस्वाल यांच्याकडून कार्यवाही सुरू आहे. परंतु अशाप्रकारचे नियमबाह्य काम सुरू करण्यास विरोध असून जवळच अनेक लोकांची घरे आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. गावात जी शांतता व सुव्यवस्था नांदत आहे त्याला छेद पडण्याचा धोका महिलांनी व्यक्त केला आहे. या दुकानामुळे गावात असलेल्या दारूड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. जर देशी दारू चिल्लर विक्री दुकानास परवाना दिल्यास महिला, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि नागरिकांकडून मोठे आंदोलन करुन विरोध करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Request for indigenous liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.