अतिवृष्टीच्या लाभासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
By Admin | Published: August 26, 2014 12:04 AM2014-08-26T00:04:27+5:302014-08-26T00:04:27+5:30
देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यात सन २०१३ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली.
गोंदिया : देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यात सन २०१३ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली.
मात्र नुकसानग्रस्तांना अद्यापही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सहेसराम कोरोटे यांच्यासह देवरी तालुक्यातील शेतकरी व बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत देवरीचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यांत आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना नेहमीच समस्यांचा सामना करावा लागतो. कधी अवर्षण तर कधी दुष्काळ या परिस्थितीतून शेतकरी बाहेर पडत नाही. मात्र यातून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना केली जात असताना त्याचा लाभही मिळत नाही. या प्रकाराकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून प्रशासकीय अधिकारीसुद्धा वेळकाढू धोरण अवलंबवितात. सदर तालुक्यातील शेतकऱ्यांना कामाचा मोबदला व अतिवृष्टीची नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)