आरक्षणाचा दिग्गज सदस्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 09:48 PM2020-03-13T21:48:07+5:302020-03-13T21:49:31+5:30

आरक्षण सोडतीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते गंगाधर परशुरामकर आणि जि.प.सदस्य कुंदन कटारे यांच्यासह दिग्गज सदस्यांना बसला. त्यामुळे आता त्यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे. तर महिलांसाठी राखीव जागांची संख्या वाढल्याने जि.प.मध्ये महिलाराज पाहायला मिळणार आहे.

Reservation hits senior members | आरक्षणाचा दिग्गज सदस्यांना फटका

आरक्षणाचा दिग्गज सदस्यांना फटका

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलांसाठी राखीव जागा वाढल्या : आरक्षण जाहीर, परशुरामकर व कटारे यांना शोधावा लागणार सुरक्षित मतदारसंघ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या २० जुलै रोजी पूर्ण होत आहे. त्यासाठी सर्कल निहाय आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.१३) जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. या आरक्षण सोडतीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते गंगाधर परशुरामकर आणि जि.प.सदस्य कुंदन कटारे यांच्यासह दिग्गज सदस्यांना बसला. त्यामुळे आता त्यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे. तर महिलांसाठी राखीव जागांची संख्या वाढल्याने जि.प.मध्ये महिलाराज पाहायला मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ५३ गटासाठी झालेल्या आरक्षण सोडतीत ३० जागा आरक्षित करण्यात आल्या.त्यामध्ये अनुसूचित जातीकरिता सहा जागांपैकी तीन जागा महिलांकरीता, अनुसूचित जमातीच्या १०जागांपैकी पाच जागा महिलांसाठी, नागरिकांचा मागासप्रवर्ग (ओबीसी) च्या १४ जागांपैकी सात जागा महिलांकरीता तर खुल्या गटातील २३ जागांपैकी १२ जागा महिलांकरीता आरक्षित करुन सोडतीद्वारे काढण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात झालेल्या आरक्षण सोडतीच्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी बेलपात्रे यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या आरक्षण सोडतीत गोंदिया तालु्क्यात सर्वाधिक अनु.जमाती व जातीचे आरक्षण आले. तसेच महिलांचे आरक्षण आल्याने राजकिय धुरंधरांचे स्वप्न धुळीस मिळाले. तर राष्ट्रवादीचे गटनेते गंगाधर परशुरामकर, कुंदन कटारे यांचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने त्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली.पी.जी.कटरे, राजलक्ष्मी तुरकर व हामीद अल्ताफ यांना मात्र परत संधी मिळाली आहे.

अनु.जाती (६ गट ३ महिला राखीव)
५ - पांढराबोडी (महिला)
१०- पिंडकेपार (महिला)
४३- गोटाबोडी (महिला)
२७- कुºहाडी
४५- ककोडी
४७- गोठणगाव
अनु.जमाती (१० पैकी ५ महिला राखीव)
२- पांजरा (महिला)
३- काटी
४- धापेवाडा
६- कामठा
११- कुडवा
१३- खमारी (महिला)
१८- ठाणा
२६- घोटी (महिला)
३५- सरांडी (महिला)
३९- सौंदड (महिला)
नामाप्र (ओबीसी) (१४ पैकी ७ महिला राखीव)
७- नागरा
१५- घाटटेमणी (महिला)
१६- किकरीपार (महिला)
१७- गोरठा (महिला)
२२- तिरखेडी (महिला)
३१- सेजगाव
३३- ठाणेगाव (महिला)
३४- कवलेवाडा
३७- पांढरी
४९- बोंडगांवदेवी (महिला)
५०- माहूरकुडा
५१- इटखेडा
५२- महागांव (महिला)
५३- केशोरी
सर्वसाधारण (२३ पैकी १२ महिला राखीव)
१- बिरसोला (महिला)
८- रतनारा
९- एकोडी (महिला)
१२- आसोली
१४- फुलचूर
१९- अंजोरा (महिला)
२०- झालीया (महिला)
२१- पिपरीया (महिला)
२३- कारूटोला (महिला)
२४- शहारवानी
२५- सोनी
२८- मुंडीपार (महिला)
२९- निंबा
३०- अर्जुनी
३२- सुकडी (महिला)
३६- वडेगाव (महिला)
३८- डव्वा (महिला)
४०- चिखली (महिला)
४१- शेंडा
४२- पुराडा
४४- भर्रेगाव
४६- चिचगड
४८- नवेगावबांध (महिला)

Web Title: Reservation hits senior members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.