११५ जणांचा नेत्रदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:12 AM2018-06-30T00:12:08+5:302018-06-30T00:13:14+5:30
विदर्भ सिंधी विकास परिषद, श्री सख्खर पंचायत व झुलेलाल अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड ज्योती अभियानांतर्गत नेत्र तपासणी शिबिर, स्वयंप्रेरणेने नेत्रदानाचा संकल्प व शपथ ग्रहण कार्यक्रम पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विदर्भ सिंधी विकास परिषद, श्री सख्खर पंचायत व झुलेलाल अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड ज्योती अभियानांतर्गत नेत्र तपासणी शिबिर, स्वयंप्रेरणेने नेत्रदानाचा संकल्प व शपथ ग्रहण कार्यक्रम पार पडला. यात ११५ जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला.
अध्यक्षस्थानी लक्ष्मीचंद रोचवानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. मधुकर कुकडे, माजी आ. राजेंद्र जैन, डॉ. अजित सिन्हा, डॉ. अरूण दुधानी, डॉ. अपर्णा गुप्ता, साजनदास वाधवानी, महेश लालवानी, माधवदास खटवानी, भाविका बघेले, इंद्रकुमार होतचंदानी, मुकेश भागवानी, धनराज आहुजा, लक्ष्मण लधानी, मनोज दुल्हानी, डॉ. दिलीप करंजेकर, डॉ. आमकर, डॉ. बोपचे व समाजबांधव उपस्थित होते.
या वेळी रोचवानी यांनी भविष्यात सदर संस्थेमार्फत कॅन्सर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात येईल, असे सांगितले. याप्रसंगी सर्व सदस्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. केटीएस रूग्णालयाच्या नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले यांनी नेत्रदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली.
तर माजी आ. राजेंद्र जैन यांनी, यापूर्वी सदर संस्थेद्वारे घेण्यात आलेले थॅलेसिमिया शिबिर, रक्तदान शिबिर, महिलांना रूबेला टीकाकरण, वाहन चालक परवाना शिबिर, आयएएस मार्गदर्शन शिबिरांबद्दल आभार मानले. तसेच लवकरच गोंदिया शहरात सुपर स्पेशालिटी कॅन्सर निर्मूलन हॉस्पिटल सुरू होणार असल्याची माहिती देवून सिंधी समाजात कार्य करणाऱ्या ‘बढते कदम’ संस्थेची प्रशंसा केली.
खा. कुकडे यांनी, सिंधी समाज नेहमीच समाज सेवेच्या कार्यात अग्रेसर असतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संपूर्ण सुविधा उपलब्ध करू व समाजाला सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. अखंड ज्योती अभियानांतर्गत एकूण ४५० लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर एकाच दिवशी जिल्ह्यात प्रथमच ११५ जणांनी नेत्र दानाचा संकल्प करून शपथ घेतली.
या वेळी उपस्थित मान्यवर व डॉक्टर यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. संचालन हरिशकुमार खत्री यांनी केले. आभार डॉ. हरिश बजाज यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्रीचंद तेजवानी, प्रेम तिर्थानी, संतोष होतचंदानी, सुखदेव रामानी, मुकेश पंजवानी, मनीषरॉय मुक्ता, जगदीश पृथ्यानी, सुशांत वासनिक, मुलचंद नेचवानी, रजनी होतचंदानी, वैशाली नूनानी, सीमा दिवानी, रीमा बजाज, सीमा सुखराणी, प्रियंका नेचवानी, नीलम चिमलानी, सीता शिवदासानी, भारती चांदवानी, कविता खत्री, तारासिंग रामानी, राकेश होतचंदानी, ओम थंदानी, दीपक कुंदनानी, प्रदीप डोडवानी, अनिल वलेचा व समाजाच्या संस्थांनी सहकार्य केले.