चित्रांशच्या विद्यार्थ्यांचा ‘ग्रीन सिटी’चा संकल्प
By admin | Published: July 23, 2014 12:05 AM2014-07-23T00:05:22+5:302014-07-23T00:05:22+5:30
संततधार पावसामुळे निसर्गात हिरवळ परसली आहे. अशा स्थितीत ममता वर्मा बहुउद्देशिय शिक्षण संस्थेंतर्गत चित्रांश अकादमीच्या प्राथमिक पूर्व विद्यार्थ्यांनी गोंदिया शहराला ‘ग्रीन सिटी’ बनविण्याचा
गोंदिया : संततधार पावसामुळे निसर्गात हिरवळ परसली आहे. अशा स्थितीत ममता वर्मा बहुउद्देशिय शिक्षण संस्थेंतर्गत चित्रांश अकादमीच्या प्राथमिक पूर्व विद्यार्थ्यांनी गोंदिया शहराला ‘ग्रीन सिटी’ बनविण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जोशी अरीकट होते. मुख्याध्यापिका रोजलिन वॉल्टर यांच्या मार्गदर्शनात नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनिअर केजीच्या शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना ग्रीन डेचे महत्त्व सांगितले. हिरव्या रोपांमध्ये हिरवे कपडे घातलेल्या विद्यार्थ्यांना वृक्षारोपण, हिरवा भाजीपाला यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य अरीकट यांनी पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लावून त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे आवाहन केले.
नर्मदा सेवा संस्थेचे माधव गारसे यांनी शाळेला सप्तपर्णीचे रोपटे भेट दिले. उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे मानवजातीला कोणते योगदान आहे, याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जेनिफर लाजरस, नेहा ठाकरे, रूचिता मेहता, भीनी शर्मा, अरूणा शुक्ला व नैना संगतानी यांनी बालकांना ग्रीन डेचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांना पर्यावरणाबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतरांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)