सर्व घटकांच्या सहकार्याने वाटचाल करण्याचा संकल्प
By admin | Published: June 11, 2016 01:54 AM2016-06-11T01:54:51+5:302016-06-11T01:54:51+5:30
गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पक्ष्याचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस : १७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
गोंदिया : गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पक्ष्याचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्वज फडकविण्यात आला.
१७ वर्षामध्ये या पक्षाने आपली कार्यकक्षा फार मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सजग राहून येणाऱ्या नगर परिषदेच्या व सहकार विभागाच्या निवडणुकांमध्ये उत्तम रितीने प्रदर्शन घडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत, असे विचार आमदार जैन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विनोद हरिणखेडे होते.
जिल्हा मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमाला जि.प.चे पक्ष नेते गंगाधर परशुरामकर, महिला राकाँपाच्या अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, देवेंद्रनाथ चौबे, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे, विद्यार्थी राकाँपाचे अध्यक्ष केतन तुरकर, भंडारा जिल्हा अर्बनचे अध्यक्ष महेश जैन, शहर अध्यक्ष शिव शर्मा, नगरसेविका सुशिला भालेराव, मनोहर वालदे, जिल्हा प्रवक्ता अशोक शहारे यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी आ.जैन म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस सदैव आपले नेते शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकास कामात अग्रसर असतो. येत्या काळात नगर परिषद व सहकार क्षेत्राच्या निवडणुका येत असून कार्यकर्त्यांनी सजग राहून पक्षाला विजयी करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागून पक्षाची ध्येयधोरणे व विकासात्मक बाबी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.
कार्यक्रमाला रमेश गौतम, बाळकृष्ण पटले, मनोज डोंगरे, जितेश टेंभरे, राजकुमार एन जैन, प्रेम रहांगडाले, नरेंद्र (नरू) हालानी, शैलेष वासनिक, विनायक खैरे, आदि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन जिल्हा प्रवक्ता रवी मुंदडा यांनी तर आभार प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी मानले. (जिलहा प्रतिनिधी)