शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 09:33 PM2018-09-09T21:33:16+5:302018-09-09T21:33:58+5:30

तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांच्या विविध समस्या व प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण जमईवार तथा गटशिक्षणाधिकारी निलकंठ शिरसाटे यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिष्ट मंडळाला दिले.

Resolve the problem of teachers | शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवू

शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवू

Next
ठळक मुद्देनारायण जमईवार : कास्ट्राईब शिक्षक संघटनेने दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांच्या विविध समस्या व प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण जमईवार तथा गटशिक्षणाधिकारी निलकंठ शिरसाटे यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिष्ट मंडळाला दिले.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्वात ६ सप्टेंबर रोजी अर्जुनी मोरगावचे गटविकास अधिकारी जमईवार तथा गटशिक्षणाधिकारी शिरसाटे यांची भेट घेवून विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनानुसार शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रस्ताव जि.प. गोंदियाला पाठविण्यात यावे, शिक्षकांचे उच्च परीक्षेला बसण्याचे पवानगी अर्ज जि.प. गोंदियाला पाठविण्यात यावे, दरवर्षी गोपनीय अहवालाची एक प्रत शिक्षकांना देण्यात यावी, शिक्षण विभागाचा आवक-जावक स्वतंत्र करावा, शालेय पोषण आहार बिल नियमित काढण्यात यावे, मासीक वेतनाची शाळा सकाळ पाळीत ठेवण्यात यावी, शिक्षकांचे थकीत वैद्यकीय व अर्जीत रजेचे बिल त्वरीत काढावे, शिक्षण विभागात स्वतंत्र्य फलकाची व्यवस्था करण्यात यावी, शिक्षकांचे एलआयसी, सोसायटी कपात नियमित करण्यासंदर्भात मुख्याध्यापकांना आदेश निर्गमीत करण्यात यावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती नियमित मिळण्यासंदर्भाने मुख्याध्यापकांना आदेश निर्गमित करावे, आॅनलाईन शिक्षक बदली २०१८ अन्वये बदली झालेल्या शिक्षकांची नोंद सेवा पुस्तीकेवर करण्यात यावी, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आवश्यकता असलेल्या शाळेत करावे, सहाव्या वेतन आयोगाची नोंद शिक्का- स्वाक्षरी नुसार करण्यात यावी, भारताचे संविधान उद्देशिका छायांकित फोटो प्रत्येक शाळेत लावण्यासंदर्भात मुख्याध्यापक यांना आदेश निर्गमीत करण्यात यावा, तेजराम गेडाम स.शि. उमरपायली यांचे भविष्य निर्वाह निधी खाते अध्यावत करण्यासंदर्भाने कार्यवाही करण्यात यावी, मुख्याध्यापक आर.के. लाडे यांचे शालेय पोषण आहार बिल त्वरीत अदा करण्यात यावे, ५ सप्टेंबर शिक्षक दिन कार्यकक्रम दरवर्षी पंचायत समिती स्तरावर घेण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सकारात्मक चर्चा होवून प्राधान्य क्रमाने वरील समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. शिष्टमंडळात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक, सुरेंद्र भैसारे, तालुकाध्यक्ष नरेश गोंडाणे, राजेश साखरे, तेजराम गेडाम, अशिक शहारे, किर्तीवर्धन मेश्राम, गुणवंत मेश्राम, रेखा गोंडाणे, सुधाकर मेश्राम, जगदीश मेश्राम, धृ्रव भैसारे, आर.के. लाडे, डी.डी. मेश्राम, आर.एस. जांभुळकर, एस.एच. तागडे, प्रकाश सांगोळे, एस.बी. तेलंग उपस्थित होते.

Web Title: Resolve the problem of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.