न्यायालयाचा निर्णयाचा आदर, मात्र लढा सुरुच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:31 AM2021-05-06T04:31:37+5:302021-05-06T04:31:37+5:30

............ सर्वाेच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर सुनावणी करताना आरक्षण रद्द केले. या निर्णयामुळे समाजबांधवांमध्ये नाराजी आहे. पण न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ...

Respect the court's decision, but the fight will continue | न्यायालयाचा निर्णयाचा आदर, मात्र लढा सुरुच राहणार

न्यायालयाचा निर्णयाचा आदर, मात्र लढा सुरुच राहणार

Next

............

सर्वाेच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर सुनावणी करताना आरक्षण रद्द केले. या निर्णयामुळे समाजबांधवांमध्ये नाराजी आहे. पण न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करीत समाजबांधवांच्या हक्कासाठी आमचा लढा सुरूच राहील.

-अशोक इंगळे, नगराध्यक्ष गोंदिया.

.....

मराठा आरक्षणासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. हे आरक्षण सामाजिक, शैक्षणिकरित्या असलेल्या मागासवर्गीय कुटुंबासाठी होते. ८५ टक्केच्यावर मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती मागासलेली आहे म्हणून आरक्षण हे आर्थिक दृष्टिकोन ठरवून असावे हे माझे मत आहे. यापुढेही आंदोलन सुरूच राहील.

-दीपक कदम,

सचिव मराठा समाज गोंदिया.

.........

आज जी घडायला पाहिजे नव्हती ती गोष्ट घडली. मराठा समाजाच्या आरक्षणाला घेऊन खूप अपेक्षा होत्या. परंतु मराठा समाजाच्या अपेक्षाचा भंग झाला आहे. हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. देवेंद्र सरकारने चार वर्षे आरक्षण टिकविले मग, या सरकारने का पाठपुरावा केला नाही.

राजू (महेंद्र) तुपकर, जिल्हाध्यक्ष मराठा महासंघ गोंदिया.

..............

मराठा आरक्षणाकरीता जिद्दीने पुन्हा कामाला लागू. मराठा समाजातील गोरगरिबांचा विचारच कुणी केला नाही. मराठ्यांनो मागे वळू नका, आपल्याला जोवर आरक्षण मिळत नाही तोवर आम्ही लढत राहू.

राजेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष क्षत्रिय मराठा समाज गोंदिया.

...........

Web Title: Respect the court's decision, but the fight will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.