पाककला स्पर्धेला प्रतिसाद

By admin | Published: July 30, 2015 01:39 AM2015-07-30T01:39:21+5:302015-07-30T01:39:21+5:30

स्थानिक गोंदिया एज्यूकेशन सोसायटीद्वारा संचालित एस.एस. गर्ल्स महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एन.के. बहेकार यांच्या मार्गदर्शनात...

Response to the cooking contest | पाककला स्पर्धेला प्रतिसाद

पाककला स्पर्धेला प्रतिसाद

Next

सखी मंचचे आयोजन : गर्ल्स महाविद्यालयात आयोजन
गोंदिया : स्थानिक गोंदिया एज्यूकेशन सोसायटीद्वारा संचालित एस.एस. गर्ल्स महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एन.के. बहेकार यांच्या मार्गदर्शनात गृहअर्थशास्त्र विभाग आणि लोकमत सखी मंचच्या संयुक्त विद्यमाने एल.जी. कंपनीद्वारे आयोजित एक दिवसीय ‘चटपटी चाट’ या विषयावर पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन जयम त्रिवेदी, कला संकाय प्रमुख डॉ. धामोरीकर, गृहविज्ञान वरीष्ठ प्रा. मून, गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गोकुळा अमित भालेराव, लोकमत सखी मंचाच्या जिल्हा संयोजिका दिपा भौमिक यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यात महविद्यालयाच्या समस्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, विद्यार्थिनी, लोकमत सखी मंच्याच्या सदस्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात गोंदिया शहरातील अनेक गृहीणी आणि विद्यार्थिनींने विविध प्रकारचे चटपटी चाट स्पर्धेच्या ठिकाणी दिलेल्या वेळात तयार केली. स्पर्धेचे निर्णायक अजय त्रिवेदी व चंचल जैन होत्या. स्पर्धेत प्रथम क्रमांक नेहा मडावी, द्वितीय स्थान अजिना खान आणि तृतीय अफरोज खानला यांनी पटकाविले. विजयी स्पर्धकांना एल.जी. द्वारे आकर्षक पारितोषीक आणि प्रत्येक स्पर्धकांना लोकमत सखी मंचाद्वारे प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या द्वितीय भागात जयम त्रिवेदीने माइक्रोव्हेवचा उपयोग करुन कमी वेळ व श्रमाद्वारे स्वादिष्ट, रुचकर आकर्षक पदार्थ बनविण्याचे प्रात्याक्षिक करून दिले. ज्यामध्ये ज्यांनी चॉकलेट केक पिज्जा चटपटी पापडी चॉ, बैंगुनी, साबूदाना खिचडी सारखे पदार्थ बनविण्याचे प्रात्याक्षीक दिले. कार्यक्रमाच्या अंतीम सत्रात विजयी स्पर्धकांना पारितोषीके व प्रमाणपत्र देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गृहअर्थशास्त्र प्रमुख डॉ. गोकुला अमित भालेराव, लोकमत सखी मंच संयोजिका दिपा भौमिक, सहयोगी प्रा. अर्चना रहांगडाले, प्रा. दिव्या जैन आणि गर्ल्स महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांंनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Response to the cooking contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.